1 minute reading time (231 words)

[checkmatetimes]खासदार सुप्रिया सुळे बसणार उपोषणाला

खासदार सुप्रिया सुळे बसणार उपोषणाला

बावधन करांना महावितरणचे सबस्टेशन मिळण्यासाठी सुळे आक्रमक

पुणे, दि. 4नोव्हेंबर2023 (चेकमेट टाईम्स):वारंवार मागणी आणि पाठपुरावा (Frequent requests and follow-ups) करूनही पूर्तता होत नसल्याने खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या (MP Supriya SuleIrritated) असून, त्यांनी आता थेट उपोषणाचाच इशारा (Warning of Hunger Strike) दिला आहे. महावितरणच्या बावधन येथील सबस्टेशनसाठी (MSEDCL Sub-Station for Bavdhan) त्यांनी हा इशारा दिला असून 20 नोव्हेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. त्याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्विट (Supriya Sule Tweet) केले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) बावधन सबस्टेशनसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. यासाठी आवश्यक असणारी जागाही सुचविण्यात आली आहे. परंतु तरीही येथे सबस्टेशन उभारण्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही, असे सांगत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. महावितरण, पुणे महापालिका (Pune Municipal Corporation), पीएमआरडीए (PMRDA) आणि पुणे जिल्हाधिकारी (Pune Collector) यांना टॅग करत त्यांनी हे ट्विट केले असून येत्या 20 नोव्हेंबर पर्यंत सबस्टेशन बाबत कार्यवाही झाली नाही, तर आपण स्वतः उपोषणाला बसू असा इशारा दिला आहे. महावितरणने याची तातडीने दखल घेऊन सबस्टेशनचा विषय मार्गी लावला नाही तर बावधनकरांसाठी आपण स्वतः 20 नोव्हेंबरला येथे उपोषणाला बसणार आहोत. जनतेच्या सुविधेसाठी (Public Convenience) हे सबस्टेशन आवश्यक आहे, परंतु जागा सुचवलेली असतानादेखील उर्जा खात्याकडून (Energy Ministry) याबाबत कार्यवाही होत नाही हे खेदजनक (Unfortunate) आहे, अशी खंतही (Regret) त्यांनी व्यक्त केली आहे.

[zeenews]विद्येचे माहेरघरात राजकारणाचे खेळ!
[maharashtratimes]वारंवार मागणी आणि पाठपुरावा; मात...