शेतकऱ्याला कांदा जाळावा लागणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव: सुप्रिया सुळे

शेतकऱ्याला कांदा जाळावा लागणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव: सुप्रिया सुळे

'शेतात पिकवलेला कांदा शेतकऱ्याला जाळावा लागतो हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अशा स्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांना झोप कशी लागते?' असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. मनमाड तालुक्यातील अंदरसुल इथं त्यांची सभा झाली. त्याआधी त्यांनी नगरसूलमध्ये एका शेतकऱ्याची भेट घेतली. कांद्याला भाव नसल्यानं कृष्णा डोंगरे यांनी 5 एकर शेतातला कांदा जाळला होता. नांदगावमध्ये शेतकऱ्याने जाळलेला कांदा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना भेट देणार आहे. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. येवला तालुक्यातील नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने कांद्याला भाव नसल्याने काल आपल्या 5 एकर शेतातील कांदा जाळला होता. सुप्रिया सुळे येवल्यात आल्या...

Read More
  127 Hits

‘उद्धव ठाकरेंनी पोलिसांशिवाय फिरुन दाखवावं’, सुप्रिया सुळेंचं आव्हान

‘उद्धव ठाकरेंनी पोलिसांशिवाय फिरुन दाखवावं’, सुप्रिया सुळेंचं आव्हान

‘उद्धव ठाकरे म्हणतात पोलीस भाजपला विकले आहेत. आम्ही पोलिसांबद्दल एकही अपशब्द खपवून घेणार नाही, गाठ आमच्याशी आहे. खरंच वाघ असाल तर 'मातोश्री'ची सर्व पोलीस सुरक्षा काढा आणि माझ्यासारखं एकटं फिरून दाखवा, असं शब्दात सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरेंनी आमच्यासारखं एकट्यानं फिरुन दाखवावं’‘उद्धव ठाकरे म्हणतात पोलीस भाजपला विकले गेले आहेत, जाऊन भांडी घासा.’ पोलिसांबद्दल एक शब्द जरी काढला तर गाठ आमच्याशी आहे. उद्धव ठाकरे जर खरच वाघ असतील तर ‘मातोश्री’चे सर्व पोलीस काढा, मी आणि विद्याताई जसे एकटं फिरतो तसं महाराष्ट्रात फिरून दाखवा. उद्धव एका पोलिसाशिवाय बाहेर जात नाही. त्यांना 40 पोलीस लागतात आणि त्याच पोलिसांना नाव ठेवता? मी ...

Read More
  134 Hits

वाहतूक कोंडीमुळे ठाण्यातील सभेसाठी सुप्रिया सुळेंची बुलेट स्वारी

https://www.youtube.com/watch?v=2m6S1hCxHkc

Read More
  124 Hits

माझा भाऊ माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल : सुप्रिया सुळे

माझा भाऊ माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल : सुप्रिया सुळे

माझ्या भावाला तुम्ही ओळखलंच नाहीत. दादा माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबद्दल बोलताना सांगितले. सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील विविध मुद्द्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. “मुंबईत राष्ट्रवादीची संघटना बांधणी कमी”मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना बांधण्यास कमी पडलो, अशी कबुली सुप्रिया सुळे यांनी दिली. शिवाय, "बाळासाहेबांनी शिवसेनेची चांगली संघटना बांधली, पण रचनात्मक बांधणी नाही. मात्र, संघटना बांधण्यापेक्षा चांगलं काम काय केलं, हाही प्रश्न आहे.", असे म्हणत सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवाय, त्यांनी ...

Read More
  122 Hits

शिवसेना मोस्ट कन्फ्युज पार्टी, तर मुख्यमंत्री कॉपी कॅट, सुप्रीय सुळेंची टीका

शिवसेना मोस्ट कन्फ्युज पार्टी, तर मुख्यमंत्री कॉपी कॅट, सुप्रीय सुळेंची टीका

शिवसेना ही मोस्ट कन्फ्युज पार्टी आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कॉपी कॅट आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी केली आहे. त्या काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. नागपूर आमदार निवासातील सामुहिक बलात्कारप्रकरणावरुनही सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ''मुख्यमंत्री नागपुरचा असताना आमदार निवासात बलात्कार होतात, ही दुर्दैवी घटना आहे.'' तसेच कर्जमाफीचा निर्णय घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस हे पंतप्रधानांची कॉपी करत मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम करण्यात धन्यता मानतात,'' अशी खरमरीत टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. तसेच शिवसेनेचाही सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेना ही मोस्ट कन्फ्...

Read More
  118 Hits

व्हिजन पुढच्या दशकाचं: राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळेंचं व्हिजन

व्हिजन पुढच्या दशकाचं: राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळेंचं व्हिजन

‘व्हिजन पुढच्या दशकाचं’ या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर तोफ डागली. ‘देशातील वातावरण सध्या बरंच गढूळ झालं आहे. कारण की, कुणी काय खायचं, काय घालायचं यावर बंधन येणं चुकीचं आहे. नागपूरमध्ये त्यादिवशी झालेल्या घटनेनं मला खूप त्रास झाला. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना होणं हे चुकीचं आहे.’ असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्राचं पुरोगामित्व पुन्हा अधोरेखित व्हावं: सुप्रिया सुळे ‘महाराष्ट्र पुरोगामी आहे पण आता त्याचं पुरोगामित्व अधोरेखित होण्याची गरज आहे. एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर दिल्लीत महाराष्ट्रातील सर्वच खासदार नेहमीच ऐकी दाखवतात. महाराष्ट्र ...

Read More
  123 Hits

कुठे गेल्या भाजपच्या मावशी, सुप्रिया सुळेंचा सरकारला टोमणा

शिवसेना भाजपशी काडीमोड घेणार हा मोठा जोक आहे, ते फक्त धमकी देतात, रुसतात आणि परत येऊन बसतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली. त्या पंढरपूरमध्ये बोलत होत्या. शिवाय निवडणुकीआधी महागाईवर बोलणाऱ्या जाहिरातीतल्या मावशीच्या शोधात आहे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही चिमटे काढले. शिवसेना आणि भाजप धमक्या देतात, रुसतात आणि परत येतात त्यामुळे आता त्यांचा ‘कोल्हा आला रे आला’सारखी परिस्थिती बनली आहे, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. भाजप सरकार गेल्या 3 वर्षात अपयशी ठरलं असून, वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले भाव पाहून सध्या मी भाजपच्या जाहिरातीमधील मावशीचा शोध घेत आहे, असा टोला...

Read More
  130 Hits

भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती.... : सुप्रिया सुळे

भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती.... : सुप्रिया सुळे

जाहिरताबाजीने काही होणार नाही. कामाला लागा आणि जाहिरातीचा पैसा गरीब माणसांना द्या, दोन आशीर्वाद मिळतील, असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारवर निशाणा साधला. त्यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. सरकारच्या जाहिरातबाजीवर जोरदार टीकास्त्र "भाजप-शिवसेनेच्या सरकारला हात जोडून माझी नम्र विनंती आहे की, जाहिरातबाजीचे पैसे कृपा करुन बंद करा. कामाला लागा. ते पैसे गरीब शेतकऱ्याला, आमच्या अंगणवाडी सेविकेला, रस्त्यांसाठी आणि विकासकामांसाठी ठेवा. जाहिरातबाजी करुन काहीही होणार नाही. आज गरीब माणसाला त्या निधीची गरज आहे. सिलेंडरची सबसिडी वाढवा किंवा गरीब महिलांना द्या. कर्जमुक्त करण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांन...

Read More
  127 Hits

हल्लाबोल आंदोलनात सुप्रिया सुळेंचा आदिवासी नृत्यावर ठेका

हल्लाबोल आंदोलनात सुप्रिया सुळेंचा आदिवासी नृत्यावर ठेका

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारविरोधात सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पारंपरिक आदिवासी नृत्यावर ठेका धरला. हल्लाबोल आंदोलनाच्या दिवसाची सुरुवात वर्ध्यातून झाली. या आंदोलनात बिडी गावजवळ मेळघाटाहून आलेले काही आदिवासी मंडळी सहभागी झाले. कोरकू आदिवासींच्या गादुली सुसुन या पारंपरिक नृत्याने हल्लाबोल पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी सुप्रिया सुळेंनी आदिवासींचं एक वाद्य हातात घेत त्यांच्यासोबत ठेका ठरला तर साडी नेसलेल्या एका चिमुकलीचं कौतुकही केलं.  <blockquote class="twitter-video" data-lang="en-gb"><p lang="mr" dir="ltr">पारंपरिक आदिवासी नृत्याने चौथ्या दिवसाचा <a href="https:...

Read More
  125 Hits

महात्मा फुले, सावित्रीबाईंना भारतरत्न द्या: सुळे

महात्मा फुले, सावित्रीबाईंना भारतरत्न द्या: सुळे

महिला शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणारे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई या महिला शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी संसदेत केल्याची माहिती सुळे यांनी ट्विटद्वारे दिली.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून सुरूवात झाली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी पहिल्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. मह...

Read More
  130 Hits

फुले दाम्पत्याला भारतरत्न जाहीर केल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरेल- सुप्रिया सुळे

फुले दाम्पत्याला भारतरत्न जाहीर केल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरेल- सुप्रिया सुळे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीबा फुले यांना भारतरत्न जाहिर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केली आहे.फुले दांम्पत्याने आपले संपुर्ण आयुष्य समाजाच्या उत्थानासाठी खर्ची घातले.दलित, शोषित,स्त्री,शेतकरी यांच्या भल्यासाठी ते शेवटपर्यंत झुंजले.आजच्या एकसंध समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्यास सलाम करण्यासाठी,त्यांना भारतरत्न जाहीर व्हावा यासाठी पक्षभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे असं देखील त्या म्हणाल्या आहेत .महात्मा फुले हे एकोणिसाव्या शतकातील महान सुधारक होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी अभूतपूर्व लढा दिला. तर देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचण्यात सावित्रीबाई फुले यांचा ...

Read More
  115 Hits

उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार

उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार

खासदार सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारपुणे, दि. ३० (प्रतिनिधी) – दिल्ली येथील फेम इंडिया संस्थेच्या वतीने देण्यात येनारा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे याना आज प्रदान करण्यात आला. आज (दि. ३०) सकाळी साडेदहा वाजता दिल्ली येथील विज्ञान भवनच्या सभागृहात केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, कोळसा आणि खाण राज्यमंत्री हरीभाई चौधरी, माजी खासदार जनार्दन द्विवेदी, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्यासह कार्तिकेय शर्मा, राजीव मिश्रा, ‘फेम’चे प्रमुख संदीप मारवाह आणि उमाशंकर ...

Read More
  125 Hits

संसदेत आवाज बारामतीचा, खा.सुळे उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित

संसदेत आवाज बारामतीचा, खा.सुळे उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित

संसदेत बारामतीचा आवाज लोकसभेत 95 टक्के उपस्थिती, कामकाजात 90 टक्के सामाजिक सहभागबारामती : प्रतिनिधीदिल्ली येथील फेम इंडिया संस्थेच्यावतीने देण्यात येणारा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार यंदा बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रे सच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. यामुळे यंदाही संसदेत बारामतीचा आवाज घुमच्याचे दिसते.शनिवारी (दि. 30) सकाळी साडेदहा वाजता दिल्लीतील विज्ञान भवनाच्या सभागृहात केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत खा.सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, कोळसा आणि खाण राज्यमंत्री हरीभाई चौधरी, माजी खासदार जनार्दन द्विवेदी, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण ...

Read More
  117 Hits

सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार

सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार

प्रभात वृत्तसेवा - सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारMarch 31, 2018 | 9:29 amबारामती -दिल्ली येथील फेम इंडिया संस्थेच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आज प्रदान करण्यात आला. शुक्रवारी (दि. 30) दिल्ली येथील विज्ञान भवनच्या सभागृहात केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, कोळसा आणि खाण राज्यमंत्री हरीभाई चौधरी, माजी खासदार जनार्दन द्विवेदी, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्यासह कार्तिकेय शर्मा, राजीव मिश्रा, फेमचे प्रमुख संदीप मारवाह आणि उमा...

Read More
  126 Hits

बँक शुल्कांद्वारे खातेदारांची लूट

बँक शुल्कांद्वारे खातेदारांची लूट

सुप्रिया सुळे http://news.supriyasule.net/wp-content/uploads/2018/03/sakal-1.jpgराष्ट्रीयीकृत बँका सातत्याने विविध शुल्कांच्या नावाखाली खातेदारांकडून मोठ्या प्रमाणावर वसुली करीत आहेत. पण रिझर्व्ह बँक असो की सरकार, कोणतीच यंत्रणा ग्राहकांच्या नाराजीची दखल घेत नाही.  राष्ट्रीयीकृत बँका ग्राहकांसाठी सर्वाधिक सुरक्षित मानल्या जात होत्या. परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या व्यवहारांबाबत शंका निर्माण होत आहेत. विशेषतः काही मोठ्या उद्योगपतींनी राष्ट्रीयीकृत बँकांची मोठी देणी थकविल्याचे उघड झाल्यानंतर हा विषय अधिक गंभीर झाला. या व्यावसायिकांना मोठी कर्जे देताना बँकांनीच नियम पायदळी तुडविल्याचे समोर येत आहे. मोठ्या कर्जबुडव्यांकडून होणाऱ्यानुकसा...

Read More
  124 Hits

शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवून लवकरात लवकर काम सुरु करावे

 शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवून  लवकरात लवकर काम सुरु करावे

पुरंदर विमानतळ आढावा बैठकीस सुप्रिया सुळे यांची उपस्थिती शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवूनलवकरात लवकर काम सुरु करावे. दिल्ली दि. ३ (प्रतिनिधी) – पुरंदर येथे होणाऱ्या विमानतळासाठी भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींचा त्यांना योग्य मोबदला मिळायला हवा. याबरोबरच तेथील पाणी प्रश्न आणि अन्य अडचणींवर योग्य तो मार्ग काढून विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.पुरंदर येथे होत असलेल्या विमानतळासंदर्भात दिल्ली येथील नागरी विमान वाहतूक मंत्रालयात झालेल्या बैठकीस त्या उपस्थित होत्या. या विमानतळाला काही स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. आपल्या जमिनी जाणार म्हणून ते संभ्रम...

Read More
  147 Hits

पुरंदर विमानतळाबाबत दिल्ली येथे बैठक

पुरंदर विमानतळाबाबत दिल्ली येथे बैठक

पुरंदर_विमानतळ_दिल्ली_बैठक पुरंदर येथील विमानतळाबाबत आज दिल्ली येथे नागरी विमान वाहतूक मंत्रालयात झालेल्या बैठकीस सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. विमातळासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा. तसेच तेथील पाणी आणि अन्य अडचणी तातडीने सोडवून लवकरात लवकर काम मार्गी लावण्याच्या सुचना सुळे यांनी केल्या.

Read More
  136 Hits

पुरंदर विमानतळाचे काम लवकर सुरू करावे- खासदार सुप्रिया सुळे

पुरंदर विमानतळाचे काम लवकर सुरू करावे- खासदार सुप्रिया सुळे

प्रभात वृत्तसेवा -April 4, 2018 | 8:07 am पुणे- पुरंदर येथे प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना जमिनींचा योग्य तो मोबदला मिळायला हवा. याबरोबर तेथील पाणी प्रश्‍न आणि अन्य अडचणींवर योग्य तो मार्ग काढून विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.पुरंदर येथे होत असलेल्या विमानतळासंदर्भात दिल्ली येथील नागरी विमान वाहतूक मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा, खासदार सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे, विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर. एन. चौबे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकी...

Read More
  128 Hits

बाबा-बुवांच्या राज्यमंत्री दर्जाविरोधात आवाज नाही - सुप्रिया सुळे

बाबा-बुवांच्या राज्यमंत्री दर्जाविरोधात आवाज नाही - सुप्रिया सुळे

सकाळ न्यूज नेटवर्क  02.57 AM बाबा-बुवांच्या राज्यमंत्री दर्जाविरोधात आवाज नाहीमुंबई - मध्य प्रदेशमध्ये बाबा-बुवांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला जातो. तरीही त्या विरोधात समाजातून आवाज उठत नाही, अशी खंत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी व्यक्त केली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सामाजिक बहिष्काराविरोधी कायद्याची माहिती शाळा - महाविद्यालयांत पोचवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे झालेल्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचे स्वागत व अंमलबजावणी परिषदेत त्या बोलत होत्या. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, आमदार नीलम गोऱ्हे आदी...

Read More
  120 Hits

डिजिटल इंडियाने पोट भर नाही - सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

डिजिटल इंडियाने पोट भर नाही - सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

शिरूर येथील हल्लाबोल आंदोलनात बोलताना सुप्रिया सुळे पुणे, दि. २० (प्रतिनिधी) – केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देशभरात जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न उभे राहतात, तेव्हा पवार साहेबच धावून येतात. डिजिटल इंडियाची गरज आहेच; पण केवळ त्याने पोट भरत नाही ते काम फक्त शेतकरीच करू शकतो, असा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.शिरूर येथे झालेल्या हल्लाबोल सभेत त्या बोलत होत्या. पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि अन्य नेते तसेच शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते याप्रसंगी उपस्थित होते.राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड मो...

Read More
  148 Hits