[Navshakti]Supriya Sule आणि Yugendra Pawar यांच्या उपस्थितीत कांदा-दूध दरवाढीसंदर्भात जनआक्रोश आंदोलन
मागील काही काळापासून कांदा व दूध दर सातत्याने घसरत आहेत. कांद्याला हमीभाव व दुधाला रास्त दर मिळावा म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती मधून जन आक्रोश आंदोलनाची ठिणगी आज (७ जानेवारी) पडली.
कांद्याला आणि दुधाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे रस्त्यावर उतरल्या आहेत. बारामतीतल्या तीन हत्ती चौकात खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ठिय्या मांडला आहे. त्यांच्या समवेत युवा नेते युगेंद्र पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित आहेत. गेल्या आठवड्यात सुप्रिया सुळे यांनी ग्रामीण भागात दौरा केला होता यावेळी बहुतांश गावांमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याच्या दराचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच दुधाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या.

