खासदार सुप्रिया सुळे यांचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन 'सावित्रीबाई नसत्या तर मी भाषण करू शकले नसते' अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात व्यक्त केली आहे,
अहमदनगरमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर प्रसार माध्यमांशी संवाद साधला
सुप्रिया सुळे यांची ओळख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या, प्रभावी खासदार अशी संपूर्ण देशाला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी सुप्रिया सुळे यांची एक विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये संपूर्ण देशाला अपरिचित अशी सुप्रिया सुळे यांची बाजू ऐकायला मिळाली. संसदीय राजकारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील वाटचाल. महारा...
विवाहेच्छूकांना नाव नोंदणी करण्याचे खासदार सुळे यांचे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या वर्षीही दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता. चालू वर्षीच्या सोहळ्यासाठी नाव नोंद...
सकाळ वृत्तसेवापुणे- पावसाअभावी दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. असंवेदनशील सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव नाही. सरकारने टॅंकर तसेच गुरांसाठी चारा छावण्या तत्काळ सुरू कराव्यात, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. सुळे व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी पदाधिकारी; तसेच तहसीलदार बालाजी सोमवंशी, गटविकास अधिकारी गणेश मोरे आदी अधिकाऱ्यांसह मंगळवारी दौंड तालुक्यातील दुष्काळी गावांचा दौरा केला. पडवी येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी समस्यांचा पाढाच सुळे यांच्या समोर वाचला. सरपंच राजेंद्र शितोळे यांनी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी केली.https://www.esakal.com/maharashtra/immediately-start-tanker-and...
बारामती शहर - राज्यातील दोन प्रमुख समजल्या जाणाऱ्या जेजुरी व मोरगाव या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज फेसबुक लाईव्ह करत थेट मुख्यमंत्र्यांनाच आवाहन करीत तातडीने दुरुस्तीची मागणी केली. केवळ हाच नाही तर राज्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी त्यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने भाविकांनी मागणी करुनही या रस्त्यांची दुरुस्ती होत नाही, काल दोन अपघात झाले दोघेही लोक रुग्णालयात दाखल झालेले आहेत. सरकारला कधी जाग येणार व कधी रस्ता नीट होणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही लोकांसाठी मी सरकारदरबार...
मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला टोला मागील काही दिवसांपासून राज्यात कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण तापले आहे. अशात महाराष्ट्र सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी बेळगावमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, कर्नाटक सरकारची परवानगी न मिळाल्याने हा दौरा स्थगित करण्यात आला होता. दरम्...
सुप्रिया सुळेंची 'ती' पोस्ट चर्चेत गेल्या काही दिवसांत सीमाभागात घडलेल्या काही घडामोडी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे.या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, हा सीमावाद चिघळू नये म्हणून मंत्र्यांना बे...
सुप्रिया सुळे शिंदे सरकारवर संतापल्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता चिघळत चालला आहे. कर्नाटकातील बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीत महाराष्ट्राच्या सहा ट्रकचे नुकसान झालं आहे. यानंतर महाराष्ट्रातून स...
सीमाप्रश्नावरुन सुप्रिया सुळे यांचा शिंदे-भाजप सरकारला टोला
सकाळ वृत्तसेवाशुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018औरंगाबाद - ‘‘दुष्काळ हे राज्यासमोरचे भीषण आव्हान आहे. मराठवाड्यात पाण्याची कमतरता भासेल. म्हणूनच पुढील चार-सहा महिने सगळ्यांनी एकीने कामाला लागावे. तुम्ही व्यवसायाला तर लागाच; पण दुष्काळासाठी काय करता येईल, हा विचारही या व्यासपीठावर करावा’’, अशी साद खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्योजक, व्यावसायिकांना घातली.शिवाई एमबीएन मराठा विकास मंडळाच्या ‘बिझनेस महाएक्स्पो २०१८’च्या उद्घाटनप्रसंगी खासदार सुळे बोलत होत्या. श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये २५ ते २८ ऑक्टोबरदरम्यान हा एक्स्पो होत आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे प्रमुख पाहुणे होते. पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष ...
सरकारनामा ब्युरोगुरुवार, 25 ऑक्टोबर 2018 सातारा : ''कोणतीही राजकिय पार्श्वभूमी नसताना केवळ सुप्रिया सुळे यांनी माझे संघटनकौशल्य पाहून मला युवती सेलचे प्रदेशाध्यक्षपद दिले, तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडुन आणले,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सक्षणा सलगर पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. गेली दोन दिवस त्यांनी सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी युवतींचे मेळावे घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. आज त्या साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात आल्या. येथे त्यांचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी स्वागत केले. यावेळी युवती सेलच्या जिल्हाध्यक्षा पुजा काळे, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्र जाधव ...
प्रभात वृत्तसेवा-October 29, 2018 | 5:50 pmपुणे: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र राज्यव्यापी संविधान बचाव आंदोलन करण्यात आले. दरम्यान आज पुणे येथील बालेवाडीत गणेश कला, क्रीडा मंडळ येथे संविधान बचाव , देश बचाव हा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देशात एक अस्वस्थतेचे वातावरण असल्याचे म्हटले. संविधान जाळण्याचे महापाप याच सरकारच्या काळात झाले. भाजपचे लोक संविधान बदलण्याची भाषा करतात, त्यावर साधी दिलगिरी व्यक्त करत नाहीत, म्हणूनच संविधान धोक्यात आहे असे आम्हाला वाटते. संविधानाविरोधात कोणीही काहीही बोलले तर आपण ते सहन न करता त्याविरोधात बोलायला हवे, असे आवाह...
नमस्कार, तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ! संक्रांत म्हणजे स्थित्यंतर ! सूर्याचे उत्तरायण आजपासून सुरू होते ! आपल्या आकाशगंगेच्या महत्त्वाच्या बदलातील एक क्षण म्हणजे ही संक्रांत !! आज देशातही असंच स्थित्यंतर सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी अभूतपूर्व अशी पत्रकार परिषद घेऊन या देशातली लोकशाही वाचवायची साद लोकांना घातलीय. ज्यांच्याकडे न्यायाची अपेक्षा घेऊन सामान्य माणूस जातो त्यांनीच न्याय मिळावा म्हणून लोकशाहितल्या सर्वशक्तिमान न्यायालयाला, म्हणजे जनतेला आवाहन केलेय. जगभरात या घटनेला भारतीय लोकशाहीचा आक्रोश म्हणून पाहिलं जातंय. अश्या काळात, इथल्या मनुवादी हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात निर्णायक लढाई लढण्याची जबाबदारी ...
सरकारी प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील (वय ८४) यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. शेतकरी विरोधी सरकारने एकप्रकारे धर्मा पाटील यांची हत्याच केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे.शिंदखेडाचे रहिवासी असलेल्या धर्मा पाटील यांच्या मालकीची शेतजमीन सरकारने उर्जा प्रकल्पासाठी ताब्यात घेतली. मात्र, यासाठी सरकारी भावाने पैसे देण्यात आले. या अन्यायाविरोधात धर्मा पाटील गेली दोन वर्ष लढा देत होते. आठवडाभरापूर्वी त्यांनी मंत्रालयात विषप्राशन केले होते. रविवारी रात्री जे जे...
राज्यात दरवर्षी १० लाखापेक्षा अधिक लोक अपघातात ठार होतात. त्यामुळं रस्ता सुरक्षा धोरण ठरवण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुळे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं रस्ता सुरक्षा धोरण प्राथमिक रित्या करण्यात आलं. त्यात प्रवासी विमा, गाडीचे चालक, वाहक यांचा विमा यासह आरोग्य, रस्ते, अपघाती क्षेत्रातल्या सुरक्षिततेसाठी करावयाच्या सूचना केल्या आहेत. येत्या काळात राज्यात परिवहन, गृह आणि बांधकाम खात्याच्या माध्यमातून धोरण तयार करण्याची मागणी सुळे यांनी केली.
राष्ट्रवादीच्या राज्यव्यापी अधिवेशनाला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अधिवेशनाचं उद्घाटन केलं. यावेळी पवार कुटुंबियांमध्ये सारं काही आलबेल आहे, असं सांगण्याचा शरद पवारांनी प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना यावेळी संबोधताना शरद पवार यांनी सिंचनप्रश्नी अजितदादांची पाठराखण करत सुप्रिया सुळेंच्या युवती मेळाव्यातील कामाचं कौतुक केलं. धरणांच्या निकृष्ट कामांसाठी नेते नव्हे तर अभियंते किंवा कंत्राटदार जबाबदार असतात, असं सांगत पवारांनी अजितदादांना क्लीन चिट दिली. तर युवती मेळाव्यामुळे राज्यात नवं नेतृत्त्व तयार होत असल्याचं पवारांनी सांगितलं. दरम्यान यावेळी शरद पवारांनी लवासाप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी वाय पी सिंह य...
अजितदादाबद्दल अनेक गैरसमज झाले आहेत. असे गैरसमज पसरवले जात आहेत. दादा कमी बोलणारा आहे, अतिशय प्रेमळ, हळवा आहे, असं राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलत होत्या. “अजितदादांवर अनेक आरोप केले जात आहेत. मात्र त्यामध्ये काही तथ्य नाही. पवार फॅक्टर 50 वर्षे महाराष्ट्रात टिकून आहे, त्यामुळे त्यांच्यावर आरोप करून अनेकजण मोठे होण्याचा प्रयत्न करत आहेत” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. बोलण्याच्या ओघात त्याच्याकडून चूक झाली. त्याबद्दल त्याने जाहीर ऑन कॅमेरा माफी मागितली. अशी माफी मागायलाही हिम्मत लागते, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं. आघाडी टिकावी ही इच्छाकाँग्रेस-राष्ट्रवादीची आ...
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून दौंडमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला. दौंड रेल्वे जंक्शन आणि शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, वाहतुकीची समस्या दौंडवासीयांना मोठ्या प्रमाणात सतावत आहे. त्यासाठी शहराअंतर्गत जाणाऱ्या रेल्वे लाईनखालून भुयारीमार्ग मंजूर केला. मागील वर्षी १४ फेब्रुवारी २०१४ रोजी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी या मार्गाचं भूमीपूजन केलं.निधीही मंजूर झाला. पण तरीही नगरपालिका हा प्रकल्प पूर्ण करण्यास टाळाटाळ करते असा आरोप सुप्रिया सुळेंनी केल...
दुष्काळाची भीषणता बघून राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या आजपासून दोन दिवसांच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील एकोड पाचोड गावापासून सुळे यांनी सकाळी दुष्काळ पाहणीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी गेवराईत अमरसिंग पंडित यांनी सुरु केलेल्या चारा छावणीलाही भेट दिली. तसंच साखर कारखाने जगवायचे असतील तर ड्रिप इरिगेशनला पर्याय नाही. त्यामुळे ऊस बंद करणं हा पर्याय नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असलं पाहिजे, त्यामुळे दारु कंपन्यांना पाणी पुरवण्याबाबत विचार करा, असंही सुप्रिया सुळेंनी सुनावलं आहे. दरम्यान मराठवाड्यातल...