2 minutes reading time (372 words)

[sakal]महाराष्ट्र द्वेषी असणाऱ्या भाजपच्या विरोधात लढाई - खासदार सुप्रिया सुळे

महाराष्ट्र द्वेषी असणाऱ्या भाजपच्या विरोधात लढाई - खासदार सुप्रिया सुळे

खडकवासला - माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाही. महाराष्ट्राचा अपमान करतो, राज्याचे हित पाहत नाही, राज्यातील नेत्यांच्या आयुष्य उध्वस्त करतो, त्या प्रवृत्तीशी आहे. मराठी अस्मितेचा प्रश्न आहे, म्हणूनच 'मेरी झांसी नही दूंगी' तसे 'मेरा महाराष्ट्र तुमको नही दूंगी' असे सांगत माझी लढाई येथील चिनू मुन्नूशी नाही, तर दिल्लीतील महाराष्ट्र द्वेशी असणाऱ्या भाजपच्या विरोधात आहे.' अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

उत्तमनगर येथील सुरेश गुजर अध्यक्ष असलेल्या जनसेवा उत्कर्ष स्वयंसहाय्यता बचत गट संघाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात खासदार सुळे रविवारी बोलत होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष- घर फोडले. शरद पवारांचा पक्ष फोडला. नितीन गडकरींचे अधिकार कमी केले. देवेंद्र फडणवीस यांना दहा मार्कवरून अडीच मार्कावर आणले. अशाप्रकारे मराठी माणसांचा अपमान करणाऱ्या अदृश्य शक्तीच्या विरोधात लढाई सुरु आहे.

असे सांगून खासदार सुळे म्हणाल्या, 'वरील चारही घटनेत जनतेचे नुकसान झाले नाही. परंतु पुणे जिल्ह्यात येणारा फॉक्सकोनचा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. येथे दीड लाख युवकांना नोकऱ्या मिळणार होत्या. मुंबईतील हिऱ्यांचा व्यवसाय हा शरद पवार यांनी तो राज्यात टिकवला. यामुळे तीन लाख नोकऱ्या तयार झाल्या होत्या. आता हा व्यवसाय देखील दुसऱ्या राज्यात जात आहे. याला कोण जबाबदार आहे. असा प्रश्न त्यांनी विचारला

खासदार सुप्रिया सुळे यांची त्रिसूत्री

मायबाप जनतेची सेवा, शेतकरी आणि महिलांचा सन्मान आणि माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी माझे प्रयत्न चालू राहतील.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,

-ताकतवर व्यक्तीशी लढण्यात खऱ्या अर्थाने मजा

- ना शिंदे, ना पवार गटांशी भांडण

-जीवनात दोन गोष्टी कमी मिळाल्या तरी चालेल

-पण स्वाभिमान कायम ठेवणार

-यशवंतराव चव्हाणच्या काळात हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला

-दिल्लीत झुकणाऱ्याना यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही

-राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री बदलण्यासाठी दिल्लीला जातात

-उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीतून पालकमंत्री ठरवले

-मी राज्यात परत येणार नाही, त्यांना चेकमेट करायला कोणीतरी पाहिजे

-२०१३- १४ मध्ये महागाई वाढल्याने आमचे सरकार गेले.

-आता २०२४ मध्ये महागाईने तुमच्या सरकारला जाणारे आहे-भारताच्या सरकारला २०२४ मध्ये येण्याची जास्त दाट शक्यता-यामुळे महागाईने दिवाळीचा आनंद घेतला नाही.-पुढच्या वर्षी खर्या अर्थाने ही आनंदाची दिवाळी असेल-मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत आरक्षण मागणार

...

Pune News : महाराष्ट्र द्वेशी असणाऱ्या भाजपच्या विरोधात लढाई - खासदार सुप्रिया सुळे | Sakal

उत्तमनगर येथील सुरेश गुजर अध्यक्ष असलेल्या जनसेवा उत्कर्ष स्वयंसहाय्यता बचत गट संघाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात खासदार सुळे रविवारी बोलत होत्या. Pune News Battle against BJP with Maharashtra Dweshi - MP Supriya Sule
[lokmat]“मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती ...
[TV9 Marathi]दिल्लीत अदृश्य शक्ती, मुख्यमंत्री शिं...