1 minute reading time (189 words)

[sakal]महाराष्ट्रद्वेशी भाजपच्या विरोधात लढाई : सुळे

महाराष्ट्रद्वेशी भाजपच्या विरोधात लढाई : सुळे

खडकवासला, ता. ६ : ''माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाही. महाराष्ट्राचा अपमान करतो, राज्याचे हित पाहत नाही, राज्यातील नेत्यांचे आयुष्य उद्‍ध्वस्त करतो, त्या प्रवृत्तीशी आहे. दिल्लीतील महाराष्ट्रद्वेशी असणाऱ्या भाजपच्या विरोधात आहे. मराठी अस्मितेचा हा प्रश्न आहे.'', अशी असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

उत्तमनगर येथील जनसेवा उत्कर्ष स्वयं सहाय्यता बचत गट संघाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात सुळे बोलत होत्या. ''शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष-घर फोडले. शरद पवारांचा पक्ष फोडला. नितीन गडकरींचे अधिकार कमी केले. देवेंद्र फडणवीस यांना दहा गुणांवरून अडीच गुणांवर आणले. अशाप्रकारे मराठी माणसांचा अपमान करणाऱ्या अदृश्य शक्तीच्या विरोधात लढाई सुरु आहे'', असे सुळे यांनी सांगितले.

सुळे म्हणाल्या, ''वरील चारही घटनेत जनतेचे नुकसान झाले नाही. परंतु पुणे जिल्ह्यात येणारा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. येथे दीड लाख युवकांना नोकऱ्या मिळणार होत्या. मुंबईतील हिऱ्यांचा व्यवसाय शरद पवार यांनी टिकवला. यामुळे तीन लाख नोकऱ्या तयार झाल्या होत्या. आता हा व्यवसाय देखील दुसऱ्या राज्यात जात आहे. याला कोण जबाबदार आहे?''

...

महाराष्ट्रद्वेशी भाजपच्या विरोधात लढाई : सुळे | Sakal

Read Latest & Breaking Marathi News on Politics, Finance, Bollywood, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle & Business. ताज्या मराठी बातम्या एकाच ठिकाणी eSakal वर!
[tv9marathi]‘सहन केले जाणार नाही, सोडणार नाही,’
[sarkarnama]सुप्रिया सुळे घेणार अजितदादांची भेट