1 minute reading time (241 words)

[sarkarnama]सुप्रिया सुळे घेणार अजितदादांची भेट

सुप्रिया सुळे घेणार अजितदादांची भेट

म्हणाल्या, "रोजच चौकशी करते, भाऊ आहे माझा..."

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे या लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री व त्यांचे बंधू अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. अजितदादांना डेंग्यूची लागण झालेली आहे. मागील चार पाच दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. सध्या ते आजारातून बरे होण्याच्या दृष्टीने विश्रांती घेत आहेत. दरम्यान, आता सुप्रिया सुळे अजितदादांना भेटणार आहेत, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना इच्छा व्यक्त केली आहे.

अजितदादांबद्दल प्रश्न विचारल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी दादांना भेटणार असल्याचे म्हटले आहे. "डेंग्यू आजार झाल्यावर माणसाने आराम करायचा असतो. अजितदादांना आरामाची गरज आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न असताना त्यात राजकारण आणणं, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही. ते बरं झाल्यावर मी त्यांना भेटायला जाणार आहे. दादांची मी रोज चौकशी करते, अजितदादा भाऊ आहे माझा," असे सुळे म्हणाल्या.

अजित पवार मागील चार-पाच दिवस आजारामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहिले नाहीत. त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे. अजूनही पुढील काही दिवस त्यांना वैद्यकीय मार्गदर्शन आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करून सांगितले होते की, "अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. त्यांची तब्येत पूर्णपणे बरी झाली की, ते संपूर्ण ताकदीनिशी जनतेच्या सेवेत दाखल होतील," असे त्यांनी ट्विट केले आहे.

[sakal]महाराष्ट्रद्वेशी भाजपच्या विरोधात लढाई : सु...
[loksatta]आरक्षण देण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये आह...