2 minutes reading time (323 words)

[loksatta]आरक्षण देण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये आहे का?

आरक्षण देण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये आहे का?

खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

पुणे: मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासंदर्भात मनोर जरांगे पाटील यांनी दोन महिन्यांची मुदत देत मोठेपणा दाखविला आहे. राज्यातील तिघाडी सरकार मात्र तारखांचा घोळ करण्यात व्यस्त आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती या तिघाडी सरकारमध्ये आहे का, हा खरा प्रश्न आहे, असा सवाल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार डेंग्यूने आजारी होते. आरोग्याच्या बाबतीत राजकारण करू नये. त्यांच्या तब्येतीची चैकशी करत आहे, असे सांगत त्यांनी अजित पवार यांचा आजार राजकीय नव्हता, हे स्पष्ट केले.चांदणी चैकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे. उड्डाणपूल उभारण्यात आल्यानंतरही या भागातील समस्या कायम राहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी चांदणी चैकाला भेट देत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी नगरसेवक सचिन दोडके आणि काका चव्हाण यावेळी उपस्थित होते.

चांदणी चौकातील संपूर्ण प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही सुळे यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री झालेले पाहायला आवडेल, अशी प्रतिक्रिया त्यांच्या आईंनी दिली आहे. यासंदर्भात बोलताना कोणत्या आईला तसे वाटणार नाही, असे सुळे यांनी सांगितले. सुळे म्हणाल्या की, पाच महिन्यांपूर्वी कांदा प्रश्न पेटणार असल्याचे सांगितले होते. वाणिज्य मंत्री पियुष गोएल यांनी त्याची दखल घेतली नाही. कांद्यावर चाळीस टक्क्यांचा कर चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला आहे. केंद्रातील आणि राज्यातील सरकार शेतकरी आणि महिला विरोधी आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. त्यासासाठी त्यांनी मोठेपणा देत सरकारला दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. राज्यातील सरकार मात्र तारखांचा घोळ करून फसवणूक करत आहे. आरक्षण देण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये आहे का, हा मूळ प्रश्न आहे. इच्छाशक्ती असेल तर ते आरक्षण देतील, असे सुळे यांनी स्पष्ट केले.

[sarkarnama]सुप्रिया सुळे घेणार अजितदादांची भेट
[jalgaonlive]शरद पवारांपाठोपाठ सुप्रिया सुळेंनी घे...