1 minute reading time (100 words)

[Lokshahi Marathi]अजित पवार मुख्यमंत्री व्हावे

अजित पवार मुख्यमंत्री व्हावे

दादांच्या आईची इच्छा; सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशातच अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आपली एक इच्छा बोलून दाखवली आहे. राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी पवार कुटुंबाने मतदान केलं. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनी मतदान केलं. यावेळी माझ्या देखतच अजितदादाने राज्याचं मुख्यमंत्री व्हावं, ही माझी इच्छा आहे, असं त्या म्हणाल्या. आशाताई पवार यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका ओळीची प्रतिक्रिया दिली आहे. अर्थातच कोणत्याही आईला आपल्या मुलाने व्हावं, असं वाटतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

[lokmat]‘आनंदाचा शिधा’मधील तेल निकृष्ट, डाळीत किडे...
[Saam TV]अजित पवार यांना डेंग्यु, आरोग्य व्यवस्थेव...