1 minute reading time (83 words)

[ABP MAJHA]चांदणी चौकाच्या कामाची श्वेत पत्रिका काढा, सुप्रिया सुळेंची मागणी

चांदणी चौकाच्या कामाची श्वेत पत्रिका काढा, सुप्रिया सुळेंची मागणी

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथील चांदणी चाैकाच्या कामाची पाहणी केली.उद्घाटन होऊन चार पाच महिने होत नाहीत तोवर या रस्त्यावर खड्डे पडत आहेत.त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेबरोबरच या संपुर्ण कामाची श्वेतपत्रिका काढणे गरजेचे आहे.त्याचबरोबर या रस्त्यावर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा गंभीर आहे. आजही अनेकजण धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडत आहेत.त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.त्यामुळे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन यावर चर्चा केली जाणार आहे.यावेळी सुरक्षिततेला प्राधान्य देऊन रस्त्याच्या संबंधित सर्व त्रुटी दूर करुण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.


[TV9 Marathi]आमची वैयक्तिक लढाई कुणाशी नाही, अजित ...
[DAINIK JANMAT]खा सुप्रिया सुळे यांचा विविध मुद्या...