भावाने मागितलं असतं तर पक्ष, चिन्ह दिलं असतं आगामी विधानसभा निवडणूक जवळ आली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा बुधवारी धाराशिवपर्यंत पोहोचली आहे. शरद पवार गटाची तुळजापूरमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं. भावाने मागितलं अ...
सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज धाराशिवपर्यंत पोहोचली. शरद पवार गटाची धाराशिवमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. "भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. "सरकारचं कौतुक ...
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या. शिवस्वराज्य यात्रेला धाराशिव जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. आज सकाळी त्यांनी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. देवीचे दर्शन घेत साकडं घातलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहमदपूर येथे पोहोचली. सुप्रिया सुळे भाषण करत असताना मराठा बांधव मंचावर पोहोचले आणि भाषण थांबवलं. मराठा आरक्षणाबाबतची तुमची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा असं आवाहन मराठा बांधवांनी केलं. शरद पवार मराठा समाजाला अडचणीतून का सोडवत नाहीत असा सवाल सुप्रिया सुळेंना मराठा बांधवांनी केला.
लातुरात सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेरत भर रस्त्यात जाब विचारला. सुप्रिया सुळे यांनीही मराठा आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेत त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत असताना मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंकडे नेमकी काय कळकळीची विनंती केली, तेच या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.
भाजप सरकारच्या विरोधात जेव्हा मी बोलते, तेव्हा माझ्या पतीला (उद्योजक सदानंद सुळे) नोटीस येते. प्राप्तीकर विभागाची (इन्कम टॅक्स) सदानंद सुळे यांना सोमवारीच (ता. 12 ऑगस्ट) नोटीस आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली..राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा सोलापूर...
शिवस्वराज्य यात्रेनिमित्त सुप्रिया सुळे लातूरमध्ये होत्या. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीचं निवेदन सकल मराठा मोर्चाच्या वतीनं सुप्रिया सुळेंना देण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी घोषणा देताच सुप्रिया सुळेही त्यात सहभागी झाल्या.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सध्या राज्यभरात सुरू आहे. आज शिवस्वराज्य यात्रेची सभा तुळजापूरमध्ये आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे उपस्थित आहेत.