राज्यात एकीकडे ही परिस्थिती असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत तर दुसऱ्या राज्यात पक्षाचा प्रचार करत आहेत. पक्ष फोडणे, ईडी, सीबीआय एवढेच उद्योग करणे जमतंय, प्रशासनात सरकारचं अजिबात लक्ष नाही. स्वार्थासाठी झालेलं हे सरकार आहे. जनतेसाठी हे सरकार नाही, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.
सुप्रिया सुळेंकडून राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना गृहमंत्री पक्षाच्या प्रचारात मग्न असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

