फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत केला जाणार आहे. अशातच आज (३ नोव्हेंबर) बीडमध्ये सुप्रिया सुळे यांनी मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर केला जावा, अशी विनंती सुप्रिया सुळेंनी सरकारला केली.
फलटणच्या महिला डॉक्टरने आत्महत्या (Phaltan Doctor Suicide Case) केली होती. डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर आरोप केले होते. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय अनेक नेत्यांनी व्यक्त केलाय. तसंच या प्रकरणाची एसआयटीमार्...
महाराष्ट्राच्यालेकीला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही या कुटुंबा सोबत आहोत. महादेव मुंडे यांच्या पत्नीची आज आम्ही भेट घेणार आहोत. याप्रकरणात कोणताही राजकीय दबाव नसला पाहिजे. जो गलत है वो गलत हैं. आम्ही दिल्लीत याच पाठपुरावा करू. सीडीआरचे रिपोर्ट लीक कसा झाला? महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण कुठून सुरू झालं? हेतपासलं पाहिजे. यात राजकीय दबाव येऊ देणार नाही. ज...
आरोपीवर कठोर कारवाईची मागणी पुणे : चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एकाने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना अतिशय संतापजनक घटना असून गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही. याला गृहखात्याची निष्क्रियता जबाबदार असल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे....

