मंगेश कोळपकर : गुरुवार, 2 ऑगस्ट 2018नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्वी विरोधी पक्षनेते होते. अभ्यासू म्हणून त्यांची प्रतिमा होती. तरीही निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी मराठा, धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे म्हटले. आता ते सांगत आहेत की, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. मग प्रचाराची भाषणे करताना कायदा आठवत नव्हता की माहिती नव्हता, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली."सरकारनामा'शी दिल्ली येथे बोलताना त्यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. राज्यातील सध्याचे पेटलेले वातावरण हे सरकारच्या कारभाराचा परिणाम असल्याचे त्यांनी नमूद केले. आरक्षणाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभांतील भाष...
रोहन टिल्लू : बीबीसी मराठी प्रतिनिधी राजीनामा दिला तर चर्चा कोण करणार "मराठा आरक्षणासाठी अनेक आमदार राजीनामा देत असले, तरी मी तशी भूमिका घेणार नाही. ज्यांनी राजीनामे दिले, त्यांच्या भावनेचा मी आदर करते. पण सगळ्यांनीच राजीनामे दिले, तर संसदेत किंवा विधानसभेत यावर चर्चा कोण करणार," अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल बीबीसी मराठीबरोबर केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये त्या बोलत होत्या. आरक्षणाची गरज, त्यासाठी काय करावं लागेल, अडचणी कुठे आहेत या आणि अशा विविध प्रश्नांची उत्तरं त्यांनी मोकळेपणे दिली.1. अनेक वर्षं महाराष्ट्रात मराठा समाजाचेच मुख्यमंत्री होते. असं असताना या सम...
सरकारनामा ब्यूरो : बुधवार, 29 ऑगस्ट 2018पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा चंद्रकांत पाटील यांच्या बांधकाम खात्याला लक्ष्य केले असून, सेल्फी विथ खड्डा आंदोलन सुरू केले आहे. सरकारला खडबडून जागे करण्यासाठी हे आंदोलन गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.सरकारने रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी रोज नवनव्या डेडलाईन देत ‘तारीख पे तारीख’ हा खेळ सुरु ठेवला आहे. त्यासाठी पुन्हा एकदा राज्यभर मोहीम त्यांनी सुरु केली आहे. गेल्या वर्षी या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला होता.``राज्य प्रगतीच्या मार्गावरुन चालत असल्याच्या प्रचार सरकार एकीकडे करीत आहे. दुसरीकडे परिस्थिती मात्र त्याच्या विपरीत आहे. प्रगतीचा मार्ग तर सोडाच परंत...
कुठली पुस्तक वाचायची हे पण सरकारने ठरवायचे का?, सुप्रीम कोर्टाने पोलीस आणि राज्य सरकारला विचारवंतांच्या अटकेवरून फटकारले यासाठी मी कोर्टाचे आभार मानते-सुप्रिया सुळे ‘सनातन’ या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेवरील कारवाईवरुन लक्ष विचलित करण्यासाठी डाव्या विचारधारेच्या विचारवंतांना अटक करण्यात आली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कुठली पुस्तक वाचायची हे पण सरकारने ठरवायचे का?, असा सवालही त्यांनी विचारला. पुणे पोलिसांनी नक्षली समर्थक असल्याच्या संशयातून देशाच्या विविध भागांमधून पाच जणांना नुकतीच अटक केली होती. या अटकेवरुन सुप्रीम कोर्टाने पोलिसांना फटकारले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ख...
शनिवार, 1 सप्टेंबर 2018 संविधानस्तंभ उभारणी लोकचळवळ व्हावी देशानं आज प्रगतीची शिखरं पार केली आहेत. अनेक क्षेत्रात आपण जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करीत आहोत. विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार, कृषी अशा अनेक क्षेत्रात आपण देदिप्यमान कामगिरी केली आहे. जगाचं लक्ष आपण वेधून घेतलंय... यासाठी देशातील प्रत्येकानं आपलं योगदान दिलं आहे. याचं कारण म्हणजे या देशवासियांची या देशाप्रती असणारी आपलेपणाची भावना. ही भावना रुजविण्यात संविधानाचा सर्वात मोठा हात आहे. म्हणूनच संविधानालाच या देशाच्या प्रगतीचा खऱ्या अर्थानं पाया असं म्हटलं तरी ते चुकीचं नाही. समाजातील सर्वांना समान न्याय देणाऱ्या या संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात स...
एक वर्षापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील रस्त्यांची दुरावस्था सरकारला दाखविण्यासाठी सोशल मीडियावर सेल्फी विथ पॉटहोल्स ही मोहीम सुरु केली होती. मात्र वर्षानंतरही रस्त्यांची अवस्था जैसे थे च असल्याचा आरोप करत पुन्हा एकदा सरकार विरोधात सेल्फी विथ पॉटहोल्स मोहीम उघडली आहे. https://www.youtube.com/watch?v=kafoQsPTwhE&feature=youtu.be
Sneha Updated Tuesday- 4 September 2018 - 6:08 PM[caption id="attachment_1867" align="alignnone" width="300"] कोणत्या शिस्तीत बसते?घाटकोपर येथील दहीहंडीच्या उत्सवात भाजपचे नेते आमदार राम कदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना चांगलचं सुनावलं आहे. “महिलांविषयी अतिशय खालच्या पातळीचे भाष्य करणाऱ्या राम कदम यांच्या वर आपण काही कारवाई करणार आहात का?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना केला.“या राज्यात रोडरोमियोंच्या त्रासामुळे मुली रस्त्यावर उतरायला देखील घाबरत असताना तुमचे आमदार मुली पळवून आणण्याची भाषा करतात, हे तुमच्या कोणत्या शिस्तीत बसत...
“संघर्ष करायची वेळ आली, तर तीच सावित्रीची लेक झाशीची राणी झाल्याशिवाय थांबणार नाही.” राहुल ढवळे, एबीपी माझा, बारामती | Last Updated: 06 Sep 2018 06:48 PM[caption id="attachment_1931" align="alignnone" width="300"] गाठ सुप्रिया सुळेशीhttps://abpmajha.abplive.in/pune/ncp-mp-supriya-sule-criticized-cm-ram-kadam-over-controversial-statement-in-dahihandi-582693
Sneha Updated Friday- 7 September 2018 - 3:16 PM[caption id="attachment_1937" align="alignnone" width="300"] सुप्रिया सुळेंनी भरला राम कदमांना दम टीम महाराष्ट्र देशा – आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी राम कदम यांना दम भरला. इंदापूरमध्ये एका कार्यक्रमात भाजपा आमदार राम कदम यांनी स्त्रियांविषयी केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा सुळेंकडून निषेध नोंदविण्यात आला. सुप्रिया सुळे इंदापूर आणि दौंड दौऱ्यावर होत्या, यावेळी सुळेंनी तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. तसेच गावात...
Mumbai[caption id="attachment_1940" align="alignnone" width="300"] 57% of potholed roads across Maharashtra fixed The Maharashtra government, out of total 43,830 km of pothole-ridden roads, has attended to a stretch of 25,384 km. The remaining bad patches are likely to be fixed by Ganesh festival. The total length of road network across Maharashtra is 88,893 km. Out of it, the state public works department claimed that it has attended the potholes on 57.91 per cent of the roads. "In Mumbai, we had attended 76.17 per cent of potholes, 67.96 per cent in Pune region, 43.83 per cent in Nasik region, 46.70 per cent in Aurangabad region, 56.39 per ...
ET Bureau|Sep 06, 2018, 07.35 PM IST[caption id="attachment_1944" align="alignnone" width="300"] “You dare touch any girl in Maharashtra and see that you will have to face me. The people in whose party are making these statements should remember this.”said NCP leader Supriya Sule.Nationalist Congress Party Chief Supriya Sule has now waded in to the row over a BJP MLA Ram Kadam threatening to ‘kidnap’ girls if they reject a marriage proposal of boys.“You dare touch any girl in Maharashtra and see that you will have to face me. The people in whose party are making these statements should remember this.”said NCP leader Supriya Sule.“It is black ...
VIDEOhttps://abpmajha.abplive.in/videos/breakfast-news-bulletin-ram-kadam-statement-issue-supriya-sule-demands-resignation-of-cm-fadnavis-582864
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- आरोग्य परिषदेतील महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत यशवंतराव चव्हाण सेंटरचे एक शिष्टमंडळ, आरोग्य मंत्रालय आणि अर्थ विभाग यांची पुढील आठवड्यात एक बैठक घेऊन शासकीय पातळीवर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आणि चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून मुंबईत १२ मे रोजी राज्यस्तरीय आरोग्य परिषद आयोजित करण्यात आली होती.'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना : उपयुक्तता, भूमिका, सल्ला आणि दुरूस्त्या' या विषयावर या परिषदेत चर्चा करण्यात आली. परिषदेला...
खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना ट्विटप्रभात वृत्तसेवा पुणे – “दुष्काळ सेस’च्या नावाखाली पेट्रोलवरील लावलेल्या अधिभाराच्या रकमेतून नेमके काय केले, त्याची आकडेवारी जाहीर करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.यासंदर्भातील ट्विट सुळे यांनी केले आहे. दरवर्षी महाराष्ट्रात कुठे ना कुठे पावसाचे दुर्भिक्ष असते. त्या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. अशा प्रसंगी संबंधित शेतकऱ्यांच्या हिताचे नाव देत राज्य सरकारने तीन वर्षापूर्वी पेट्रोलवर “दुष्काळ सेस’ लावला. प्रतिलिटर तीन रुपये असा त्याचा दर आहे. आज देशातील सर्वात महागडे पेट्रोल महाराष्ट्रात विकले जाते. दराने नव्वदी गाठली आहे. सेसमधून मा...
सरकारनामामंगळवार, 18 सप्टेंबर 2018 मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित दादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि 'महाराष्ट्राची आर्थिक,सामाजिक परिस्थिती सुधारु दे' असे साकडे लालबागचा राजाला घातले. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर सिध्दीविनायकाचेही दर्शन घेतले. महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकप्रिय भावंडे अशी ओळख असलेले विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सहकुटुंब मुंबईतील लालबागचा राजा आणि सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तसेच सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे उपस्थित होते. अजितदादा आणि सुप्रियाताई यांनी...
बुलेट ट्रेन झाली नाही तरी चालेल, टॅब मिळाला नाही तरी चालेल; परंतु शिक्षक व शाळा या झाल्याच पाहिजेत, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: September 20, 2018 01:59 AM | Updated: September 20, 2018 01:59 AM बारामती : मुले चांगल्या शिक्षकांमुळेच हुशार होतात. विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या टॅबवर माझा अजिबात विश्वास नाही. या टॅबमुळे मुले अजिबात हुशार होत नाहीत. तंत्रज्ञानावर फार जोर देऊ नये. बुलेट ट्रेन झाली नाही तरी चालेल, टॅब मिळाला नाही तरी चालेल; परंतु शिक्षक व शाळा या झाल्याच पाहिजेत, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद, पुणे व पंचायत समिती बारामती यांच्या...
मिलिंद संगई11.26 AMबारामती - राज्यातील रोडरोमिओंची हिम्मत लेकींच्या अब्रु लुटण्यापर्यंत वाढली आहे. या राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही, असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पुण्याच्या हिंजवडी परिसरात बारा वर्षीय दोन मुलींवर बलात्कार झाला. त्या पैकी एका मुलीचा मृत्यू झाला ही घटना धक्कादायक व मन सुन्न करणारी असल्याची प्रतिक्रीया सुळे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना टॅग करीत, राज्याचे गृहमंत्रालय महिला सुरक्षेबाबत पूर्णतः निष्क्रीय ठरले असल्याची टीका सुळे यांनी केली आहे.रोडरोमिओंची हिम्मत इतकी वाढते याचा अर्थ या राज्यात कायद्याचा धाकच उरलेला नाही हे सिध्द करणा...
सरकारनामा ब्युरोशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018 बारामती : राज्यातील रोडरोमिओंची हिम्मत लेकींच्या अब्रु लुटण्यापर्यंत वाढली आहे. या राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही असा संतप्त सवाला खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पुण्याच्या हिंजवडी परिसरात बारा वर्षीय दोन मुलीवर बलात्कार झाला, त्यापैकी एका मुलीचा मृत्यू झाला ही घटना धक्कादायक व मन सुन्न करणारी असल्याची प्रतिक्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना टॅग करीत राज्याचे गृहमंत्रालय महिला सुरक्षेबाबत पूर्णत: निष्क्रीय ठरले असल्याची टीका सुळे यांनी केली आहे. रोडरोमिओंची हिम्मत इतकी वाढते याचा अर्थ या राज्यात कायद्याचा धाकच उर...
सकाळ वृत्तसेवा01.38 AMहिंजवडी - हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी सांत्वन केले. या घटनेतील आरोपींनी लवकर कठोर शिक्षा देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी तिच्या नातेवाइकांनी सुळे यांच्याकडे केली. कासारसाई परिसरात दोन दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. त्यात एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी पीडित मुलगी भेदरलेल्या अवस्थेत आहे.या वेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, माजी तालुकाध्यक्ष सुनील चांदेरे, युवकचे तालुकाध्यक्ष नीलेश पाडाळ...