1 minute reading time (217 words)

[sarkarnama]भाजपने राष्ट्रवादीला ऑफर...

सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट !

सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट !

Supriya Sule On BJP Offer : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एक नवा गौप्यस्फोट केला आहे. भाजप आज जर आमच्यावर 'नॅचरल करप्ट पार्टी' असा आरोप करत होती, तर आमच्यासोबत मागील दाराने चर्चा का करत होती? भाजपने राष्ट्रवादीला ऑफर का दिली होती? असा थेट सवाल करत सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "भाजपला मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही राष्ट्रवादीला नॅचरल करप्ट पार्टी म्हणत होता. एकीकडे छगन भुजबळ म्हणतात की, सातत्याने भाजप आणि राष्ट्रवादीची चर्चा होत होती. एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करून 'ना खाऊंगा ना खाने दूंगा' म्हणणारा भाजप आमच्याबरोबर चर्चा करायला का बसला? भुजबळांच्या म्हणण्यानुसार भाजपनेच राष्ट्रवादीला ऑफर दिली होती. याचाच अर्थ भाजपने आमच्यावर खोटे आरोप केले. यामुळे भाजपने राष्ट्रवादीची माफी मागितली पाहिजे."

सुळे म्हणाल्या, "शरद पवारांनी ज्यावेळी राजीनामा दिला. त्यांना तो द्यायचाच नव्हता; पण या सगळ्यांचा जो भाजपसोबत जाण्याचा आग्रह होता, त्यामुळे ते दुखावले गेले. आणि तो राजीनामा दिला, खरंतर त्यांची राजीनामा द्यायची अजिबात इच्छा नव्हती. तुम्हाला ते नाट्य वाटत असेल, आमच्यासाठी ते वास्तव होतं."

[loksatta]“अजित पवारांच्या २ जुलै आणि पहाटेच्या शप...
[Mumbai Tak]अजित पवार vs शरद पवार वाद पुन्हा तापला...