दूध दरवाढ आंदोलनावर काय बोलल्या सुप्रिया सुळे.. पहा

दूध दरवाढ आंदोलनावर काय बोलल्या सुप्रिया सुळे.. पहा

https://www.facebook.com/Tv9Marathi/videos/856723307856793/

Read More
  240 Hits

दूध दरवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात ‘पुंगी बजाओ’ आंदोलन

दूध दरवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात ‘पुंगी बजाओ’ आंदोलन खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

लोकसत्ता ऑनलाइन  | July 16, 2018 दुधाला ५ रूपये दरवाढ मिळावी यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'पुंगी बजाओ' आंदोलन केले. शेतकरी पोटतिडकीने मागण्या मांडत असताना या सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. आता दूधासाठी हक्काचा दर तो मागतोय. दुधाला ५ रूपये दरवाढ मिळावी यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पुंगी बजाओ’ आंदोलन केले. राज्य सरकार सातत्याने गरीब, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप सुळे यांनी केला आहे. दुधाचा भाव वाढलाच पाहिजे असे म्हणत स्वाभिमानी...

Read More
  255 Hits

भर पावसात सुप्रियाताई उतरल्या रस्त्यावर -

भर पावसात सुप्रियाताई उतरल्या रस्त्यावर

https://goo.gl/vTyPfZ  @supriya_sule @NCPspeaks @MumbaiNCP @chitrancp

Read More
  272 Hits

पहा कशासाठी पिपाणी वाजवतायतं सुप्रिया सुळे

पहा कशासाठी पिपाणी वाजवतायतं सुप्रिया सुळे भर पावसात पिपाणी आंदोलन

बुलढाणा: राज्याच्या विविध भागांमध्ये सोमवारपासून दूध आंदोलनाने जोर पकडला. सोलापूर, जालना, बुलडाणा, अमरावती आणि पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. या आंदोलनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर बुलढाण्यात थेट रस्त्यावर उतरून भर पावसात पिपाणी आंदोलनही केले. यावेळी सुप्रिया सुळेंना राजू शेट्टींच्या आंदोलनाला आमचा... https://m.dailyhunt.in/news/india/marathi/zee+news+marathi-epaper-zeemar/paha+kashasathi+pipani+vajavatayat+supriya+sule-newsid-92466529?ss=wsp&s=a

Read More
  254 Hits

स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण स्पर्धा परीक्षा आंदोलन

Marathi News >> माय मराठी >> homeMonday, 16 Jul, स्पर्धा परीक्षा आंदोलन पुणे-स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले . या उपोषणात राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुहास उभे व स्पर्धा परिक्षा सेलचे पुणे शहर अध्यक्ष विक्रम मधुकर गायकवाड यांच्या नेतुत्वाखाली करण्यात आले . यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषण स्थळी भेट देउन मागण्याचे निवेदन स्वीकारले . या सदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले कि , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित ...

Read More
  259 Hits

दुधाला दर देण्यास सरकार गंभीर नाही : सुप्रिया सुळे

दुधाला दर देण्यास सरकार गंभीर नाही : सुप्रिया सुळे

Marathi News >> पुढारी >> Main EditionMonday, 16 Jul, दूध_दर_आंदोलन पुणे : पुढारी ऑनलाईन दुधाला योग्य दर देण्याबाबत हे सरकार गंभीर नाही, असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांनी राज्यात सुरू असलेल्या दूध दर आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुधाकडे विद्यमान राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यासाठी पुण्यात आंदोलन करत दूध उत्पादक शेतकऱ्यांचा...

Read More
  247 Hits

मतं विकायला निघालेल्या जनतेची सुप्रिया सुळे घेणार दखल

मतं विकायला निघालेल्या जनतेची सुप्रिया सुळे घेणार दखल

https://www.facebook.com/Tv9Marathi/videos/687576871593755/

Read More
  239 Hits

संविधान ही भारतीयांची ओळख : खासदार सुप्रिया सुळे

संविधान ही भारतीयांची ओळख : खासदार सुप्रिया सुळे 'मेरा संविधान मेरा अभिमान'

संविधान प्रोटेस्ट ऑफ फेसबुकर्सच्या माध्यमातून 'मेरा संविधान मेरा अभिमान' या निषेधपर कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन केले होते. लोकसत्ता ऑनलाइन | August 13, 2018 मेरा संविधान मेरा अभिमान' संविधान ही भारतीयांची ओळख असून संविधानाच्या विरोधात जर चुकीचे काम होत असल्यास पंतप्रधानांनी त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करत पोलीस यंत्रणेने त्यांना शिक्षा दिल्यास पुन्हा एकदा देशात संविधान जाळण्याचा कोणी विचारही करणार नाही, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात व्यक्त केले. दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर काही व्यक्तींनी भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्याची घटना घडली होती. याचा व्हिडिओ समोर आल्यावर त्या घटनेचा निषेध देशभरातून करण्यात येत आहे. पुण्...

Read More
  248 Hits

संविधानाच्या सन्मानासाठी पुण्यात तरुणाई रस्त्यावर

संविधानाच्या सन्मानासाठी पुण्यात तरुणाई रस्त्यावर तरुणाईला पाठींबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित

ऑनलाइन लोकमत  | Follow  | Published: August 13, 2018 संविधानाच्या सन्मानासाठी पुण्यात तरुणाई रस्त्यावर दिल्लीत संविधानाची प्रत जाळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात तरुणाईने रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. पुणे : दिल्लीत काही समाजकंटकांकडून संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ पुण्यातील गुडलक चाैकात तरुणाई रस्त्यावर उतरली. फेसबुकवरील तरुणाईने स्थापन केलेल्या एका ग्रुपने संध्याकाळी संविधानाची प्रस्तावना अाणि भारतीय झेंडे हातात धरत निदर्शने केली. या तरुणाईला पाठींबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, पत्रकार संजय अावटे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे अादी उपस्थित हाेते. यावेळी संविधानचा जयजयकार करणाऱ्या...

Read More
  240 Hits

पूजा घालायच्या असतील तर त्या स्वतःच्या घरी घाला – खासदार सुप्रिया सुळे

पूजा घालायच्या असतील तर त्या स्वतःच्या घरी घाला – खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे

महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे तेव्हा ज्या काही पूजा घालायच्या असतील तर त्या स्वतःच्या घरी घाला असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. Perform Puja At Your Home Supriya Suleलोकसत्ता ऑनलाइन | August 24, 2018 07:51 pmमहाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे तेव्हा ज्या काही पूजा घालायच्या असतील तर त्या स्वतःच्या घरी घाला असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पूजा करण्याला आमचा विरोध नाही. पण अशा पूजा शैक्षणिक संकुलात नको. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाच्या पूजेवरुन झालेल्या वादावर बोलताना त्यांनी हे विधान केले.पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांच्या समस्या...

Read More
  260 Hits

“दुष्काळ सेस’च्या रकमेचे काय केले?

खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना ट्‌विटप्रभात वृत्तसेवा पुणे – “दुष्काळ सेस’च्या नावाखाली पेट्रोलवरील लावलेल्या अधिभाराच्या रकमेतून नेमके काय केले, त्याची आकडेवारी जाहीर करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.यासंदर्भातील ट्‌विट सुळे यांनी केले आहे. दरवर्षी महाराष्ट्रात कुठे ना कुठे पावसाचे दुर्भिक्ष असते. त्या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. अशा प्रसंगी संबंधित शेतकऱ्यांच्या हिताचे नाव देत राज्य सरकारने तीन वर्षापूर्वी पेट्रोलवर “दुष्काळ सेस’ लावला. प्रतिलिटर तीन रुपये असा त्याचा दर आहे. आज देशातील सर्वात महागडे पेट्रोल महाराष्ट्रात विकले जाते. दराने नव्वदी गाठली आहे. सेसमधून मा...

Read More
  273 Hits

आम्हाला न्याय द्या

सकाळ वृत्तसेवा01.38 AMहिंजवडी - हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी सांत्वन केले. या घटनेतील आरोपींनी लवकर कठोर शिक्षा देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी तिच्या नातेवाइकांनी सुळे यांच्याकडे केली. कासारसाई परिसरात दोन दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. त्यात एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी पीडित मुलगी भेदरलेल्या अवस्थेत आहे.या वेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, माजी तालुकाध्यक्ष सुनील चांदेरे, युवकचे तालुकाध्यक्ष नीलेश पाडाळ...

Read More
  294 Hits

कायद्याचा धाक राखण्यात सरकारला अपयश : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा12.19 PMभाणगाव (ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्याचा प्रकार घडला. ही घटना धक्कादायक आहे. या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.पुणे : एकीकडे जातीअंतासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे जाती-जातींतील दऱ्या वाढत आहेत. त्यातूनच अशा घटना घडत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कायद्याचा धाक अबाधित राखण्यात या सरकारला आलेले अपयश हेच आहे, अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.भाणगाव (ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्याचा प्रकार घडला. ही घटना धक्कादायक आहे. या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाह...

Read More
  298 Hits

दुष्काळी परिस्थितीचे भान राखा; सत्कारांवर खर्च नको : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवागुरुवार, 11 ऑक्टोबर 2018पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यांनंतर आज (दि. ११) आज त्या जळगाव जिल्ह्यात आहेत. या दौऱ्यात त्यांची भेट घेणारे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यानी हारतुरे किंवा सत्कारांवर खर्च करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. ''राज्यातील बहुतांश ठिकाणी दुष्काळाची स्थिती गंभीर असुन बळीराजासह सर्वच घटक दुष्काळामुळे अडचणीत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शक्यतो आदर सत्कारावरील आपल्या दौऱ्यादरम्यान हारतुरे, सत्कार यांवर खर्च करण्याचे टाळावे. आपले बांधव दुष्काळामुळे होरपळत असताना सत्कार, हारतुरे स्वीकारणे योग्य नाही,'' असे त्यांनी म्हटले आहे.सत्कार...

Read More
  289 Hits

मुख्यमंत्र्यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करावा

राजेंद्रकृष्ण कापसे09.14 AMउत्तमनगर - "मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी 31 ऑक्टोबर तारीख मागितली आहे. परंतु, राज्यातील 60 तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने मुख्यमंत्र्यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करावा." अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'सकाळ'शी बोलताना केली. उत्तमनगर येथील जनसेवा उत्कर्ष स्वयंसहायता बचतगट महासंघाचे 14 व्या लाभांश वाटप कार्यक्रमानंतर त्या सकाळशी बोलत होत्या.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या सोमवारी पुण्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढणार आहे. असे सांगून त्या म्हणाल्या, मागील 10-15 दिवसापासून नुकताच मी मराठवाडा विद...

Read More
  289 Hits

मी मुख्यमंत्र्यांसारखं खोट बोलतं नाही : सुप्रिया सुळे

योगिराज प्रभुणे, सोमवार, 22 ऑक्टोबर 2018 पुणे : सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची फसवणूक फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार या योजनेतून केली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केली. "जलयुक्त शिवार'च्या कामाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे टोलवत त्या म्हणाल्या, "माननीय मुख्यमंत्री जेव्हा पुण्यात येतील तेव्हा हे त्यांना जरूर विचारा. हा त्यांचा, त्यांच्या सरकारचा "फ्लॅगशिप प्रोग्रॅम' आहे. त्यामुळे त्याचं उत्तर त्यांनीच दिले पाहिजे. कारण, त्यांच्यासारखे नुसते आरोप करण्याची माझी स्टाइल नाही आणि खोटं मी बोलत नाही.'' "जलतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जलयुक्त शिवार हा कार्यक्रमाची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी झाली. पुरेसा...

Read More
  323 Hits

खंडणी मागणाऱ्या आमदारावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी- सुप्रिया सुळे

Published 24-Oct-2018 04:21 ISTपुणे- भाजपच्या आमदाराने खंडणी घेऊन १ आठवडा होऊन गेला तरी मुख्यमंत्री गप्पच आहेत. मुलींना उचलून नेऊ म्हणणारे आमदार राम कदम व खंडणी मागणारे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करणे आवश्यक असताना क्लिनचिट दिली की काय? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. सुळे यांच्या हस्ते मंगळवार (दि.२३) रोजी दौंड तालुक्यातील केडगाव येथे दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. सुळे पुढे म्हणाल्या की, या सरकारने देशात जीएसटी आणली परंतु त्यामुळे सर्वच सुखी आहेत का? महागाई संपली का? नोटबंदीमुळे काळा पैसा संपला का? असे अनेक प्र...

Read More
  265 Hits

मुख्यमंत्र्यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करावा

राजेंद्रकृष्ण कापसेसोमवार, 22 ऑक्टोबर 2018उत्तमनगर - "मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी 31 ऑक्टोबर तारीख मागितली आहे. परंतु, राज्यातील 60 तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने मुख्यमंत्र्यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करावा." अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'सकाळ'शी बोलताना केली. उत्तमनगर येथील जनसेवा उत्कर्ष स्वयंसहायता बचतगट महासंघाचे 14 व्या लाभांश वाटप कार्यक्रमानंतर त्या सकाळशी बोलत होत्या.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या सोमवारी पुण्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढणार आहे. असे सांगून त्या म्हणाल्या, मागील 10-15 दिवसापासून नुकताच ...

Read More
  288 Hits

आम्ही देवाऐवजी संविधानाची शपथ घेतो : सुप्रिया सुळे

आम्ही देवाऐवजी संविधानाची शपथ घेतो : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा  : सोमवार, 26 नोव्हेंबर 2018 We Swear By The Constitution Rather Than God Said Supriya Suleपुणे : ''अजित पवार, शरद पवार आणि मी देवाची शपथ न घेता संविधानाची शपथ घेतो''  असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. आज (ता.26) पुण्यातील धनकवडी भागात असलेल्या लोकनेते शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन याठिकाणी संविधान स्तंभ उभारण्यात आला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आणि संविधान सन्मान अभियानाचा शुभारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळा त्या बोलत होत्या.खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने बारामती लोकसभा मतदार संघात ठिकठिकाणी संविधान स्तंभ बसवण्य...

Read More
  323 Hits

जनतेच्या प्रश्नांना बगल देण्यासाठीच राम मंदिराचा मुद्दा समोर-शरद पवार

जनतेच्या प्रश्नांना बगल देण्यासाठीच राम मंदिराचा मुद्दा समोर-शरद पवार

जनतेच्या प्रश्नांशी सरकारला देणेघेणे नाही का? असाही प्रश्न शरद पवारांनी विचारला आहे. जनतेच्या प्रश्नांना बगल लोकसत्ता ऑनलाइन | November 26, 2018 06:38 pm राज्यात शेतकरी दुष्काळाने होरपळतो आहे, त्यांना मदतीची आवश्यकता आहे. ते करण्याचे सोडून आणि लोकांच्या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करत भाजपा आणि शिवसेनेने राम मंदिर आणि अयोध्येचा प्रश्न समोर आणला आहे अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. तसेच रामाच्या मूर्तीची उंची किती असावी? यावर राज्याच्या मुख्यमंत्र्याना सविस्तर चर्चा करायची आहे मग जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे आहे का? असेही शरद पवारांनी विचारले आहे. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने संविधान स्तंभ लोकार्पण सोहळा...

Read More
  268 Hits