भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. विरोधी उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे ऐनवेळी इंडिया आघाडीची मते फुटली असल्याचे समोर आले आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.