खासदार सुळे यांनी पोस्ट केलेल्या चिमुकल्या संग्रामच्या व्हीडीओवर लाईक्सचा पाऊस

इंदापूर : आपल्या मतदार संघातील वेगवेगळ्या गावांना सातत्याने भेट देऊन तेथील लोकांना भेटणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, पाठपुरावा करणे, एखादी चांगली गोष्ट आढळून आली तर आवर्जून तिथं थांबणे, कौतुक करणे, पाठीवर हात ठेवून शाबासकी देणे... या गोष्टींसाठी खासदार सुप्रिया सुळे या सतत अग्रेसर असतात. नुकत्याच एका दौऱ्यात त्यांना ...

Read More
  616 Hits

जगभर कांद्याची टंचाई, तर भारतात फेकून देण्याची वेळ

निर्यातबंदी मागे घेऊन कांदा जागतिक बाजारपेठेत पाठवा - खासदार सुप्रिया सुळे पुणे : कृषीमालाच्या आयात-निर्यात धोरणात सातत्य नसल्याचा मोठा फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी तातडीने मागे घेऊन देशातील जास्तीचा कांदा जागतिक बाजारपेठेत पाठविल्या...

Read More
  774 Hits

आकाशात मुक्त विहार करणाऱ्या फ्लेमिंगोंचा व्हिडीओ खा. सुळे यांनी पुन्हा केला पोस्ट

कुंभारगाव-इंदापूरला भेट देण्याचे पर्यटकांना आवाहन इंदापूर : उजनीचा विस्तीर्ण जलाशय आणि त्यावर मुक्त विहार करणारे फ्लेमिंगो पक्षी ही चालू हंगामातील एक नितांत सुंदर अशी पर्वणीच असते. हजारो किलोमीटरचा प्रवास करून या धरणाकाठी वास्तव्यास आलेल्या या परदेशी पाहुण्यांचा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा व्हिडीओ पोस्ट केला असून सोशल मीडियावर तो चांगलाच...

Read More
  762 Hits

अंगणवाडी सेविकांना न्याय मिळायला हवा

खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पुणे : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर गेल्या आहेत. महिला आणि बालकांचे आरोग्य तथा कुपोषण यांसारख्या अनेक बाबींमध्ये अंगणवाडी सेविकांचे अत्यंत महत्वाचे योगदान असते. त्यांना सरकारने योग्य तो न्याय द्यायला हवा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्य...

Read More
  759 Hits

ओडिशामध्ये आंदोलकांनी थांबवलेली हावडा एक्स्प्रेस खा. सुळेंच्या मध्यस्तीनंतर सुखरूप रवाना

रेल्वेमंत्र्यांकड़े तत्काळ पाठपुरावा करून मदत केल्याबद्दल प्रवाशांकडून सुळे यांचे आभार पुणे : कोलकाता येथून निघालेली हावडा एक्सप्रेस ओडिशामध्ये आंदोलकांनी अडविली होती. या गाडीत बारामती लोकसभा मतदारसंघातील तसेच महाराष्ट्रातील काही प्रवासी आहेत. त्यांची सुरक्षा आणि गाडी पुढे निघायला हवी यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केल्यानंतर गाडी पुढे ...

Read More
  704 Hits

संसदरत्न पुरस्कारासाठी डॉ. अमोल कोल्हे आणि डॉ. फौजिया खान यांचे खा. सुळेंकडून अभिनंदन

पुणे: चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीच्या संसदरत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि राज्यसभेच्या खासदार डॉ. फौजिया खान यांना जाहीर झाला आहे. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ट्विट करत त्यांनी अभिनंदन केले असून राष्ट्र...

Read More
  774 Hits

"...और कारवाँ बनता गया"

शरद पवार यांचा साठच्या दशकातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल पुणे : "...और कारवाँ बनता गया!"अशी कॅप्शन देत खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार शरद पवार यांचा १९५६ सालातला एक फोटो पोस्ट केला आहे. शरद पवार यांनी २२ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिल्यांदा विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यांच्या या संसदीय कारकीर्दीला यावर्षी ५६ वर्षे पुर्ण झाली. त्य...

Read More
  722 Hits

जेजुरी - कोळविहिरे भुयारी रेल्वे मार्गाचे काम तातडीने करा : खासदार सुप्रिया सुळे

पुरंदर : पुणे ते मिरज दुहेरीकरण अंतर्गत असणाऱ्या जेजुरी-कोळविहीरे रेल्वे भुयारी मार्गाचे काम रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील पुर्ण होऊ शकले नाही. याठिकाणी स्थानिकांना होणारा त्रास आणि होणारे अपघाताला नागरिक अक्षरशः कंटाळले आहेत, असे सांगत तातडीने हे काम पूर्ण करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.र...

Read More
  760 Hits

पालखी मार्गावरील फुरसुंगी ते सासवड रस्त्याचे काम तातडीने हाती घ्या : खा. सुप्रिया सुळे

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील फुरसुंगी ते सासवड दरम्यानच्या कामासाठी सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर काम सुरू करून नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाला केली आहे. अत्यंत वर्दळीचा हा रस्ता असून सातत्याने वाहतूक कोंडी होत ...

Read More
  799 Hits

बावधन बुद्रुक मधील पिबल्स २ सोसायटीचा पाणी प्रश्न सोडवा. - खा. सुळे यांच्या पालिका आयुक्तांना सूचना

पुणे : बावधन बुद्रुक येथील पिबल्स २ सोसायटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई असून येथील रहिवास्यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. महापालिकेने लवकरात लवकर येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्तांना केली आहे. या सोसायटीमधील नागरीकांना टॅंकरसाठी मोठी रक्कम...

Read More
  623 Hits

खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम; जागतिक दर्जाचे संग्रहालय येणार आपल्या दारी

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या फिरत्या बस आता पुण्यात पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आणि चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप...

Read More
  1005 Hits

तोरणा किल्ल्यावर पायी चढून जात खासदार सुळे यांचे तरुणांसमोर तंदुरुस्तीचे उदाहरण

वेल्हा : 'आपला मतदार संघ, आपला अभिमान' अभियानांतर्गत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज वेल्हा तालुक्यात तोरणा गडाला भेट दिली. तब्बल चौदाशे मीटर उंच असलेल्या या किल्ल्यावर पायी चढून जात त्यांनी तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि शारीरिक तंदुरुस्तीचे उदाहरण दिले. तीन महिन्यांपूर्वी (दि. १ नोव्हेंबर) त्या अशाच रीतीने अवघ्या दोन तासात राजगड किल्ल्यावर चालत ग...

Read More
  924 Hits

वेल्हा पोलीस ठाण्याची नवीन इमारत लवकरच पूर्णत्वास: खा. सुळे यांनी केली पाहणी

वेल्हा : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केलेल्यानिधीतून वेल्हे पोलीस ठाण्याची प्रशस्त आणि देखणी इमारत उभी रहात आहे. काम वेगात सुरू असून लवकरच या नव्या कोऱ्या इमारतीत वेल्हा पोलीस ठाण्याचे कामकाज सुरू होईल. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भेट देऊन या कामाची पाहणी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री ...

Read More
  816 Hits

खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते माण येथील मलनिसा:रण प्रकल्पाचे उद्घाटन

मुळशी : मुळशी तालुक्यातील माण येथे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर प्रथमच उभारण्यात आलेल्या मलनिसा:रण प्रकल्पाचे (एसटीपी प्लांट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग ओझरकर, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे,...

Read More
  722 Hits

ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांची पुण्यात उद्यापासून चार दिवस दख्खन जत्रा

पुणे : पुणे जिल्हापरिषद, विभागीय आयुक्त कार्यालय आणि ग्रामविकास मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील महिला बचतगटांच्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी विभागीय दख्खन जत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील गोळीबार मैदान येथे उद्या (दि. १७) पासून सोमवार (दि. २० फेब्र...

Read More
  700 Hits

ज्यांच्या आंदोलनाचे भांडवल करून सत्तेत बसलात त्यांना तरी न्याय द्या

एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवरून खासदार सुप्रिया सुळे यांचा सरकारला संतप्त सवाल पुणे : वेळेवर पगार होत नसल्याच्या कारणावरुन कवठेमहांकाळ येथे कार्यरत असणारे एसटी चालकाने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या असून ज्यांच्या आंदोलनाचे भांडवल करून सत्तेत बसलात त्यांना तरी न्याय द्या, अशा शब्दात आपला संताप व्यक्त क...

Read More
  704 Hits

परदेशात शिकत असलेल्या अडचणीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरा : खा. सुप्रिया सुळे

पुणे : ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत येथे शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील काही विद्यार्थ्यांना एटिकेटी लागल्याने त्यांना मिळत असलेली 'राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती' बंद झाली आहे. अशा स्थितीत त्यांचे शैक्षणिक शुल्क भरले नाही, तर त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होण्याची शक्यता असल्याने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. त्य...

Read More
  719 Hits

कलागुणांना वाव देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे

पुणे : आपल्या मतदार संघातील जे जे सर्वोत्तम असेल त्याचा अभिमान बाळगणे आणि त्याच्या प्रचार प्रसिद्धीसाठी आग्रही असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच एखाद्याच्या उत्तम कलागुणांनाही वाव देताना दिसतात. किल्ले सिंहगड परिसरातील पक्षीनिरीक्षण केंद्र अर्थात बर्ड व्हॅलीच्या एक से एक अप्रतिम पाहुण्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या फोटोग्राफरचे त्यांनी आ...

Read More
  854 Hits

जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा वाढवा : खासदार सुप्रिया सुळे

पुणे : जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाची संख्या एक हजारांहून अधिक पर्यंत वाढवावी. याचा थेट फायदा या मुलांना मिळू शकेल, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. जलसंपदा विभागामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच...

Read More
  681 Hits

दहावी बारावीच्या परीक्षांचा कालखंड आणि शेतीची कामे सुरू आहेत, वीजपुरवठा तोडू नका

खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी पुणे : सध्या राज्यातील शेतीची बहुअंशी कामे सुरू आहेत. शिवाय दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर आहेत. अशा प्रसंगी वीजपुरवठा खंडित करणे उचित नसल्याचे सांगत महावितरणला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.राज्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद...

Read More
  873 Hits