1 minute reading time (138 words)

बावधन बुद्रुक मधील पिबल्स २ सोसायटीचा पाणी प्रश्न सोडवा. - खा. सुळे यांच्या पालिका आयुक्तांना सूचना

बावधन बुद्रुक मधील पिबल्स २ सोसायटीचा पाणी प्रश्न सोडवा. - खा. सुळे यांच्या पालिका आयुक्तांना सूचना
पुणे : बावधन बुद्रुक येथील पिबल्स २ सोसायटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई असून येथील रहिवास्यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. महापालिकेने लवकरात लवकर येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्तांना केली आहे.

या सोसायटीमधील नागरीकांना टॅंकरसाठी मोठी रक्कम खर्च करावी लागत आहे. रोज पाणी विकत घ्यावे लागत असल्याने हा मोठा आर्थिक व मानसिक त्रास येथील रहिवासी सहन करत आहेत, तरी त्यामुळे येथील पाणीप्रश्न सोडविणे अत्यावश्यक असल्याने आपण स्वतः येथे लक्ष देऊन लवकरात लवकर पाणीप्रश्न मार्गी लावावा, असे त्यांनी म्हटले आहे. 

पालखी मार्गावरील फुरसुंगी ते सासवड रस्त्याचे काम त...
खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम; जागतिक दर्ज...