2 minutes reading time (317 words)

कलागुणांना वाव देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे

कलागुणांना वाव देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे

पुणे : आपल्या मतदार संघातील जे जे सर्वोत्तम असेल त्याचा अभिमान बाळगणे आणि त्याच्या प्रचार प्रसिद्धीसाठी आग्रही असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच एखाद्याच्या उत्तम कलागुणांनाही वाव देताना दिसतात. किल्ले सिंहगड परिसरातील पक्षीनिरीक्षण केंद्र अर्थात बर्ड व्हॅलीच्या एक से एक अप्रतिम पाहुण्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या फोटोग्राफरचे त्यांनी आज भरभरून कौतुक केले आहे. 

कल्पेश नुकते असे या फोटोग्राफरचे नाव आहे. हिंदुस्थान टाइम्स या दैनिकात ते कार्यरत आहेत. सिंहगड बर्ड व्हॅलीमध्ये येणाऱ्या एकाहून एक सुंदर रंगीबेरंगी पक्षांची छायाचित्रे त्यांनी टिपली आहेत. काल (दि. १२) च्या हिंदुस्थान टाइम्सच्या अंकात त्यांपैकी काही छायाचित्रे प्रसिद्ध झाली.

ती पाहून लागलीच खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या टीम च्या माध्यमातून कल्पेश यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून आणखी काही छायाचित्रे घेत आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून आज प्रसिद्ध केली आहेत. खासदार सुळे यांनी नुकताच 'आपला मतदार संघ आपला अभिमान' हे अभियान सुरू केले आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून त्या मतदार संघातील जे जे सर्वोत्तम असेल, किंवा ऐतिहासिक वारसास्थळ, अथवा एखाद्या शेतकऱ्याने आपल्या शेतात हटके काही प्रयोग राबवला असेल, तर आवर्जून खासदार सुळे या त्या ठिकाणी भेट देतात. त्यांचे कौतुक करतात; आणि पाठीवर हात ठेवून शुभेच्छा देतात. 

Stunning photographs from Sinhagad Valley!

Thank you Kalpesh Nukte- Hindustan Times for sharing👍🏼 

परदेशात शिकत असलेल्या अडचणीतील विद्यार्थ्यांचे शैक...
दहावी बारावीच्या परीक्षांचा कालखंड आणि शेतीची कामे...