1 minute reading time
(188 words)
दहावी बारावीच्या परीक्षांचा कालखंड आणि शेतीची कामे सुरू आहेत, वीजपुरवठा तोडू नका
खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी
राज्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत खासदार सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. महावितरण कंपनीकडून सध्या जोरदार कारवाई सुरू असून राज्यभर मोठ्या प्रमाणात शेती आणि घरगुती वापराची वीज खंडीत केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना तसेच नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या शेतात पिकांना पाणी देण्यापासून इतर कामे सुरु आहेत. त्याचा मोठा खोळंबा होत आहे.
याबरोबरच दहावी व बारावीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असल्याने विद्यार्थी त्याची तयारी करीत आहेत. त्यांनाही वीज नसल्याने अभ्यास करताना अडचणी येत आहेत. तेही सध्या सुरु असणारी शेतीची कामे तसेच परीक्षांचा काळ लक्षात घेता नागरीकांचा वीजपुरवठा खंडित करु नये, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील अनेक भागातील शेतकरी आणि घरगुती वापराची वीज महावितरणकडून खंडीत केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना तसेच नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या शेतात पिकांना पाणी देण्यापासून इतर कामे सुरु आहेत. त्याचा मोठा खोळंबा होत आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) February 13, 2023