1 minute reading time
(129 words)
खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते माण येथील मलनिसा:रण प्रकल्पाचे उद्घाटन
मुळशी : मुळशी तालुक्यातील माण येथे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर प्रथमच उभारण्यात आलेल्या मलनिसा:रण प्रकल्पाचे (एसटीपी प्लांट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग ओझरकर, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे, माणचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक गावकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

ग्रामपंचायत पातळीवर उभारण्यात आलेल्या या पर्यावरणपुरक प्रकल्पासाठी सुळे यांनी गावकऱ्यांसह सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे कौतूक केले. या प्रकल्पातून जल शुद्धीकरण होते; आणि शेतकऱ्यांना खत पुरवठा केला जातो.
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील माण ता. मुळशी येथील मलनिसा:रण प्रकल्पाचे (एसटीपी प्लांट) उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रकल्पाची पाहणी करुन माहिती घेतली. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर उभारण्यात आलेला हा पहिलाच प्रकल्प आहे. pic.twitter.com/cS8cpFOmDc
— Supriya Sule (@supriya_sule) February 16, 2023