1 minute reading time (209 words)

जेजुरी - कोळविहिरे भुयारी रेल्वे मार्गाचे काम तातडीने करा : खासदार सुप्रिया सुळे

Untitled-design-8-1-1-1
पुरंदर : पुणे ते मिरज दुहेरीकरण अंतर्गत असणाऱ्या जेजुरी-कोळविहीरे रेल्वे भुयारी मार्गाचे काम रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील पुर्ण होऊ शकले नाही. याठिकाणी स्थानिकांना होणारा त्रास आणि होणारे अपघाताला नागरिक अक्षरशः कंटाळले आहेत, असे सांगत तातडीने हे काम पूर्ण करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.

रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे सुळे यांनी ही मागणी केली असून रेल्वे प्रशासनाला तातडीने हे काम पुर्ण करण्याचे आदेश द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे. याठिकाणी अनेक वेळा अपघात झाले आहेत. त्यामुळे कामाच्या पूर्ततेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुरंदर तालुका सरचिटणीस सोमनाथ खोमणे हे येत्या ३ मार्चपासून बेमुदत उपोषण करणार आहेत, ही बाबही त्यांनी लक्षात आणून दिली आहे.

नागरीकांना होणारा त्रास लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. तसे प्रशासनाला आदेश द्यावेत, असे ट्विट करत त्यांनी अश्विनी वैष्णव यांना टॅग केले आहे. 

"...और कारवाँ बनता गया"
पालखी मार्गावरील फुरसुंगी ते सासवड रस्त्याचे काम त...