खासदार सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र भोर : भोर येथे मत्स्य व्यवसायिक ज्याठिकाणी व्यवसाय करतात, त्याठिकाणी भोर नगर परिषदेने प्रशासकीय इमारतीचा विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. असे झाल्यास अनेक मत्स्य व्यावसायिकांचा व्यवसाय बुडून आर्थिक नुकसान होऊ शकते, तरी याबाबत योग्य तो तोडगा काढून गोरगरीब व्यावसायिकांना दिलासा मिळवून द्यावा, अश...
बाह्यवळण महामार्गावर स्वामीनारायण मंदिर ते रावेत इलेव्हेटेड हायवेसाठी डीपीआर तयार
केंद्राने चार हजार कोटींचा डीपीआर तयार केल्याची खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती पुणे : मुंबई-बंगळूर बाह्यवळण महामार्गावरील नऱ्हे भागातील स्वामी नारायण मंदिर ते रावेत या संपूर्ण परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी एलिव्हेटेड हायवे बांधण्यासाठी ४ हजार कोटी रुपयां...
चांदणी चौकातील वाहन आणि पादचाऱ्यांच्या अडचणी अद्यापही संपलेल्या नाहीत
सविस्तर अभ्यास करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी पुणे : चांदणी चौकातील रस्त्याचे काम पुर्ण झाले असले तरी या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडी मधून सुटका झाली नाही. वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांच्या अडचणी आणि दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचलकांना कसरती कराव्या लागत आहेत, तरी तातडीने या अडचणी सोडवून चांदणी चौका...
एसटी गाड्यासह सर्व स्थानकांची दुरुस्ती, स्वछता आणि हिरकणी कक्ष उभारणीची गरज
जेजुरी स्थानक अद्ययावत करा : खासदार सुप्रिया सुळे यांचे राज्य सरकारला पत्र पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील भोर, वेल्हा, मुळशी आदी तालुक्यासह अन्य सर्वच तालुक्यांतील एसटी स्थानकांच्या इमारती तसेच गाड्या आणि अन्य अडचणी दूर कराव्यात अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. विशेषतः राज्य आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांचे श्रद्धा...
भोर आणि वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचा प्रश्न तातडीने सोडवा
शिक्षणशास्त्र पदवीधारक बेरोजगार तरुणांच्या नियुक्तीचा खा. सुळे यांनी सुचवला पर्याय भोर; बारामती लोकसभा मतदार संघातील भोर आणि वेल्हे हे तालुके दुर्गम व डोंगराळ असून येथील विद्यार्थी शिक्षणासाठी पूर्णपणे जिल्हा परिषदेच्या शाळांवर अवलंबून आहेत. तथापि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकच नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या शाळ...
बारामती लोकसभा मतदार संघातील दुष्काळी भागात चारा छावण्या, पाण्याचे टँकर सुरू करा
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे मागणी पुणे : जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आदी तालुक्यात अद्यापही पावसाचे प्रमाण अत्यल्प असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन चारा छावण्या तसेच पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली ...
शरद पवार इन्स्पायर फेलोशीप'च्या तिसऱ्या वर्षीची घोषणा
आजपासून अर्ज करण्याचे खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहन पुणे : आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशीप'च्या तिसऱ्या वर्षीची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या...
सलग तीन महिने पावसाचे प्रमाण अत्यल्प
राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी पुणे : संपूर्ण महाराष्ट्रातच यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले असून काही भागात तर अद्याप पाऊस झालाच नाही. शेतकऱ्यांच्या हातचे पिक निघून गेले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने त्यांना तातडीने विम्याची रक्कम देण्याबरोबरच राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खास...
पुणे-सोलापूर पॅसेंजरला बोरीबेल स्थानकावर थांबा मिळावा
खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी दौंड : दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे हे रेल्वे स्थानक परिसरातील गावांसाठी सोयीचे आहे. परंतु पुणे-सोलापूर पॅसेंजर येथे थांबत नाही. यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. तरी या गाडीला याठिकाणी थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडे केली आहे. रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना टॅग करत सुळे ...
बारामती येथील रेल्वेच्या जागेतील सर्व्हिस रस्त्याच्या कामाची सुळे यांच्याकडून पाहणी
अडचणीवर मार्ग काढल्याबाबद्दल मानले आभार बारामती : बारामती येथील रेल्वेच्या जागेतील सर्व्हिस रोडमुळे शहरातील शेकडो नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव आणि रेल्वे विभागाचे आभार मानले आहेत. येथील कामाची आज खासदार सुळे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ही प...
रोहिडेश्वराच्या प्रवेशद्वाराजवळ बुरुजाची पावसामुळे पडझड
तातडीने दुरुस्तीची खा. सुळे यांची मागणी पुणे: स्वराज्याची साक्ष देणाऱ्या किल्ले रोहिडेश्वर (रोहिडा) गडाच्या प्रवेशद्वाराजवळील तटबंदी बुरुज बुधवारी (दि. १० ऑगस्ट) रात्रीच्या वेळी मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. त्याची दुरुस्ती तसेच किल्ल्यावर जाणाऱ्या गडप्रेमींच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सुविधा पूर्ण कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केल...
कात्रज कोंढवा रस्त्यावर स्मशानभूमी चौकात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात
अपघातानंतर खासदार सुळे यांची मागणी पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर खडीमिशन पोलीस चौकीपासून जवळच झालेल्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. सातत्याने या ठिकाणी अपघात आणि वाहतूक कोंडी होती असल्याने येथे कायमसावरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी ट्विटद्वारे केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रशासनाने याबाबत गांभीर्याने ...
बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांबात खा. सुळे यांची गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा
लेखी निवेदन देत तातडीने कामे करण्याची मागणी दिल्ली : बारामती लोकसभा मतदार संघातून जाणारे विविध राष्ट्रीय महामार्ग आणि त्यांवरील प्रलंबित तसेच चालू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेऊन सुळे यांनी या मागण्यांबाबत सविस्त...
संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर गोखळी, तरंगवाडी येथे उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग करावा
खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्राकडे मागणी पुणे : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर इंदापूर तालुक्यातील मौजे गोखळी आणि तरंगवाडी या गावातील स्थानिक नागरिकांसाठी उड्डाण पुल अथवा भुयारी मार्ग करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडे केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी ही म...
डोंगराळ भागात दरडी कोसळू नये यासाठी संरक्षक जाळी बसवून उपाययोजना कराव्यात
दुर्घटना घडण्यापूर्वी युद्धपातळीवर कामे हाती घेण्याबाबत खा. सुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील भोर, वेल्हे, मुळशी व पुरंदर तालुक्यातील काही भाग तालुके डोंगराळ असून अतिवृष्टीचे आहे. या भागातील धोकादायक दरडी तसेच रस्त्यालगतच्या कड्यांना तातडीने संरक्षक जाळी बसविण्यात याव्यात. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी युद्धपातळीवर ...
बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे ४५ कोटी रुपये मंजूर
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्ते व इतर विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ४४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांसाठी सुळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर निधी मंजूर झाला असून प्रलंबित कामे तात...
भुगाव येथे बाह्यवळण रस्ता तर घोटावडे फाटा येथे उड्डाणपुलाची सुळेंची केंद्राकडे मागणी
पुणे : मुळशी तालुक्यातील भूगाव येथे रस्ता रुंदीकरणास वाव नसल्याने बाह्यवळण रस्ता केल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी बाह्यवळण रस्ता करावा. तसेच घोटावडे फाटा येथे उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आ केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांच्याकडे सुळे यांनी पत्राद्वारे ही मागणी केली असून तस...
महाविद्यालयीन प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळण्यातील अडचणी दूर करा
खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी पुणे : सध्या महाविद्यालयीन प्रवेश सुरु आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले आवश्यक आहेत. परंतु शासकीय यंत्रणांकडून विविध कारणांमुळे दाखले देण्यास उशीर होत आहे. शासनाने याची दखल घेऊन ही प्रक्रिया सुलभ आणि जलद करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ...
पुष्पगुच्छ, भेटवस्तूऐवजी गरजू मुलांना आवश्यक साहित्य वाटप करावे
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला खासदार सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शुभंचिंतकांना आवाहन पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच अन्य शुभचिंतकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तके, शालेय वस्तू, रेनकोट आदी भेटवस्तू आदींचे ...
भांडगाव-खुटबाव रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यात यावा
खा. सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी दौंड : दौंड तालुक्यातील भांडगाव-खुटबाव या रस्त्यावर परिसरातील औद्योगिक व इतर कारणांमुळे मोठ्या प्रमाणात जड व प्रवासी वाहतूक आहे. खुटबाव रेल्वे स्थानकात दुरुस्तीचे काम सुरु असल्यास बऱ्याच वेळा हा मार्ग बंद राहतो. ही कोंडी टाळण्यासाठी याठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे या...