निर्णय मागे घेण्याची खा. सुळेंची मागणी पुणे : विधवा महिलांसाठी 'गंगा भागीरथी' असा शब्दप्रयोग करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असून हे अतिशय वेदनादायी आहे, असे सांगत तो निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना त्यांनी याबाबत पत्र लिहिले आहे. लोढा यांनी काल (दि.१२) महिला...
स्वतः सेल्फी घेत कष्टकऱ्यांच्या घामाला खासदार सुप्रिया सुळे यांनी केला सलाम
दुधवाल्याचा 'तो' फोटो होतोय व्हायरल पुणे : 'त्यांच्या कष्टाला सलाम' असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी दुधविक्रेत्यासोबत आज सकाळी घेतलेला एक सेल्फी आपल्या सोशल मीडिया अकौंटवरुन पोस्ट केला आहे. भल्या सकाळी दूध विक्रेत्यासोबत घेतलेला त्यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. शहरांच्या गर्दीत हरविलेल्याकष्टकऱ्यांचा हा आणखी एक चेहरा...! या बिरुदाखाली ...
कोविड विरोधातील संघर्ष अद्याप संपला नाही काळजी घ्या
खा. सुळे यांचे सोशल मीडियावरून आवाहन पुणे : कोविडच्या विरोधातील आपला संघर्ष अद्याप संपलेला नसल्याचे सांगत आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. चालू आठवड्यात देशातील वेगवेगळ्या राज्यांतून आणि केंद्र सरकारकडून कोरोना संदर्भात येणारी आकडेवारी आणि तत्तसंबंधाने प्रसिद्ध होत असलेल्या वृत्ताचा दाखला देत खासदार सुळे ...
फुरसुंगी कचरा डेपोला लागणाऱ्या आगीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज
खा. सुप्रिया सुळे यांची महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी पुणे : फुरसुंगी येथील कचरा डेपोला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे आसपासच्या परिसरात धुराचे लॉट पसरत असून प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तरी पुणे महापालिका आणि जिल्जाधिकारी कार्यालयाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्र...
गुन्हेगारांवर गृहखात्याचा वचक राहिला नाही काय
संजय राऊत धमकी प्रकरणी खा. सुळे यांचा केंद्र आणि राज्य सरकारला रोखठोक सवाल पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमकीवरून खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या असून गुन्हेगारांवर गृहखात्याच्या वचक राहिला नाही काय, असा रोखठोक सवाल केंद्र आणि राज्य सरकारला उद्देशून उपस्थित केला आहे.खासदार संजय राऊत यांना एका व्यक्तीने फोनवरून जीवे मारण्...
सुषमा अंधारे यांच्याबाबत बेताल बोलणाऱ्या आमदार शिरसाटांवर कारवाई व्हायलाच हवी
महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा दाखला देत खा. सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि...
केंद्राच्या पंतप्रधान पुरस्कारासाठी आयपीएस तेजस्वी सातपुते यांचे खा. सुळेकडून अभिनंदन
दिल्ली : प्रशासनातील उत्कृष्ट सेवेसाठी केंद्र सरकारच्या वतीने दिला जाणारा पंतप्रधान पुरस्कार (पीएम अॅवॉर्ड फॉर एक्सलन्स इन पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन) जाहीर झाल्याबद्दल वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी आयपीएस तेजस्वी सातपुते यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदी कार्यरत असताना तेजस्वी सातपुते यांनी ऑपरेशन...
जिल्हा परिषदेच्या ग्रामअभ्यासिकेचा लाभ घेण्याबाबत खा. सुळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
पुणे : पुणे जिल्हा परिषदेने अनु. जाती, अनु. जमाती, वि.जा.भ.ज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या शाहू फुले आंबेडकर ग्रामअभ्यासिकेचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन केले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने अनु. जाती, अनु. जमाती, वि.जा.भ.ज प्रवर्गाच्या विद्यार्थ्य...
दौंड तालुक्यातील कृषी प्रक्रिया उद्योगांना भेट देण्यासाठी खा. सुळे यांचे केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण
दिल्ली : दाैंड तालुक्यातील अन्न प्रक्रियेशी संबंधित कृषी प्रक्रिया उद्योग आणि कोल्ड स्टोरेज उद्योगांना भेट देण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी आमंत्रित केले. खासदार सुळे यांनी आज त्यांची भेट घेऊन निमंत्रीत केले. बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड तालुक्यात असलेल्या आर्या ग्रिनफिल्ड...
वारजे येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या भूमीपूजनासाठी खा. सुळे यांचे केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण
बारामती मतदार संघातील गॅस पाईपलाईन, सीएनजी आणि स्वछतेबाबतही सविस्तर चर्चाखा. सुळे यांची घेतली केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा दिल्ली : वारजे येथे साडेतीनशे खाटांचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाच्या भूमीपूजनासाठी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी यावे, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना केली. या...
महाविकास आघाडीच्या समर्थक, कार्यकर्त्यांवर दडपशाही मार्गाने सरकारकडून कारवाया
कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर असल्याची ग्वाही देत खा. सुळे यांनी नोंदवला शासनाचा निषेध पुणे : राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचे समर्थक, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असून त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या कारवायांचा आम्ही कठोर शब्दात निषेध करतो, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनाच्या दडपशाहीचा निषेध नोंदवला आहे.र...
हिंजवडी आणि माणसाठी पाणी, वाहनतळ आणि अन्य सुविधांबाबत खा. सुळेंची मागणी
पुणे : हिंजवडी आणि माण परिसरात पाणी साठवण टाक्या, पुरेसे वाहनतळ आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची गरज असून 'पीएमआरडीए'ने तशा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबरोबरच माण येथे पोलीस चौकी उभारण्याबाबतही विचार व्हावा, असे त्यांनी म्हटले आहे.पीएमआरडीए'कडे त्यांनी ट्विटद्वारे ही मागणी केली आहे. हिंजवडी आणि मा...
नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी देणे पुणेकरांसाठी चांगले नाही
सहा हजार झाडे तोडण्याच्या महापालिकेच्या निर्णयास खासदार सुप्रिया सुळे यांचा विरोध पुणे : विकास हा पर्यावरणपूरक आणि निकोप व्हायला हवा, ही आमची ठाम भूमिका आहे, असे सांगत नदीसुधार प्रकल्पासाठी पुणे महापालिकेकडून सहा हजार झाडे तोडली जाणार असल्याच्या निर्णयावर खासदार सुप्रिया सुळे यांनी सडकून टीका केली आहे. शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीची सुधारणा करण्यात य...
राष्ट्रीय जल अकादमीच्या जागेत क्रीडांगण तथा उद्यान उभारणीस जागा उपलब्ध करावी
खा. सुप्रिया सुळे यांची जलसक्ती मंत्र्यांशी चर्चा दिल्ली : खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नांदेड परिसरातील राष्ट्रीय जल अकादमीची मोठी जागा आहे. ही जागा क्रीडांगण तथा उद्यानासाठी उपलब्ध करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन खासदार सुळे यांनी या विषयावर त्यांच्याशी ...
बारामती लोकसभा मतदार संघात गॅस पाईपलाईन आणि सीएनजी स्टेशन्स वाढवावे
खा. सुळे यांची केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा दिल्ली : बारामती लोकसभा मतदारसंघातील गॅस पाइपलाईन आणि सीएनजी गॅस स्टेशन्स वाढवण्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. बारामती लोकसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त घरांना पाईपलाईनने स्वयंपाकाचा गॅस पुरविण्याबाबत यावेळी ...
राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेत्या दिव्यांग खेळाडू मुलीचे खासदार सुळेंकडून कौतुक
पॅरा ऑलिम्पिक साठी सहकार्याचे आश्वासन बारामती : पोहण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेत १७ ते २१ या वयोगटात सुवर्णपदक पटकावणारी बारामती येथील दिव्यांग विद्यार्थिनी वरदा कुलकर्णी हिचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पॅरा ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असलेल्या या मुलीला आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी...
शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांचा शासनावर संताप
आडमुठेपणा तातडीने बंद करण्याची मागणी पुणे: शेतकऱ्यांना खते देताना भरून घेण्यात येणाऱ्या अर्जात त्यांची जात विचारली जात आहे. ही बाब लक्षात येताच खासदार सुप्रिया सुळे राज्य सरकारवर चांगल्याच संतापल्या असून तातडीने हा प्रकार बंद करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांची जात विचारली जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांपैकी एक ब...
उपनगरांतील स्ट्रीट लाईटचे काम पंधरा एप्रिलपर्यंत होणार पूर्ण
खासदार सुळे यांना पालिका आयुक्तांचे आश्वासन पुणे : शहरालगतच्या उंड्री, पिसोळी, आंबेगाव, सुस व बावधन येथील स्ट्रीट लाईटचे काम १५ एप्रिल पर्यंत महापालिका पुर्ण करेल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. खासदार सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली असून पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी तसे आश्वासन दिल्याचे त्यांन...
बारामती उपविभाग ठरला देशातील सर्वाधिक अन्नप्रक्रिया असणारा उपविभाग
खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कृषी अधिकाऱ्यांचे अभिनंदन पुणे : कृषी विभागांतर्गत बारामती उपविभाग हा देशातील सर्वाधिक अन्नप्रक्रिया उद्योग असणारा उपविभाग ठरला असून त्यासाठी ३८१९.२८ लाख रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती उपविभागतील सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून शुभेच्छाही दिल्या आहेत. कृषी विभा...
पुरंदर तालुक्यातील काही गावांच्या कनेक्टिव्हीटीसाठी बीएसएनएलचे टॉवर उभरावेत
खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्राकडे मागणी पुणे: पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडी, मिसाळवाडी, कुंभोशी, देवडी, दावनेवाडी, शेलारवाडी, पिसाळवाडी, पिंगोरी, सोमोर्डी,वरदवाडी आणि धनकवडी या भागात मोबाईल कनेक्टिव्हीटी अतिशय कमी आहे. तरी या भागात बीएसएनएलचे टॉवर उभारण्यात यावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.केंद्रीय दूरसंचार म...