1 minute reading time
(98 words)
दौंड तालुक्यातील कृषी प्रक्रिया उद्योगांना भेट देण्यासाठी खा. सुळे यांचे केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण
दिल्ली : दाैंड तालुक्यातील अन्न प्रक्रियेशी संबंधित कृषी प्रक्रिया उद्योग आणि कोल्ड स्टोरेज उद्योगांना भेट देण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी आमंत्रित केले.
खासदार सुळे यांनी आज त्यांची भेट घेऊन निमंत्रीत केले. बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड तालुक्यात असलेल्या आर्या ग्रिनफिल्ड, टेस्टी बाईट्स, तन्वी कोल्ड स्टोअरेज व वेअरहाऊस आणि वसंत कोल्ड स्टोरेज या उद्योगांनी गुणवत्ता, उत्पादन, आणि पायाभूत सुविधा उभारणीत आपला ठसा उमटवला आहे. या उद्योगांना भेट देऊन पाहणी करावी, असे सुळे यांनी यावेळी त्यांना सांगितले.पारस यांनी यावेळी त्यांचे निमंत्रण स्वीकारत सकारात्मक प्रतिसाद दिला. यासाठी खासदार सुळे यांनी त्यांचे आभार मानले.