1 minute reading time
(175 words)
फुरसुंगी कचरा डेपोला लागणाऱ्या आगीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज
खा. सुप्रिया सुळे यांची महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी
पुणे : फुरसुंगी येथील कचरा डेपोला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे आसपासच्या परिसरात धुराचे लॉट पसरत असून प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तरी पुणे महापालिका आणि जिल्जाधिकारी कार्यालयाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे फुरसुंगीसह मंतरवाडी, गणेशनगर तसेच आसपासच्या परिसरात गेले दोन-तीन दिवस धुराचे लोट तयार होत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण तर होत असून परिसरातील नागरीकांच्या आरोग्यासाठी ते हानीकारक आहे, ही बाब खासदार सुळे यांनी ट्विट करत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

पुणे महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे. याठिकाणी आगी लागू नयेत किंवा लागल्या, ते त्यावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या, असे त्यांनी म्हटले आहे.
फुरसुंगी येथील कचरा डेपोला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे फुरसुंगीसह मंतरवाडी, गणेशनगर तसेच परिसरात धुराचे लोट तयार होत असून याचा नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण तर होत आहेच यासह परिसरातील नागरीकांच्या आरोग्यासाठी ते हानीकारक आहे. पुणे…
— Supriya Sule (@supriya_sule) April 3, 2023