1 minute reading time
(192 words)
कोविड विरोधातील संघर्ष अद्याप संपला नाही काळजी घ्या
खा. सुळे यांचे सोशल मीडियावरून आवाहन
पुणे : कोविडच्या विरोधातील आपला संघर्ष अद्याप संपलेला नसल्याचे सांगत आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
चालू आठवड्यात देशातील वेगवेगळ्या राज्यांतून आणि केंद्र सरकारकडून कोरोना संदर्भात येणारी आकडेवारी आणि तत्तसंबंधाने प्रसिद्ध होत असलेल्या वृत्ताचा दाखला देत खासदार सुळे यांनी आपल्या सोशल मिडिया अकौंटवरून पुन्हा एकदा राज्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याची काळजी घेण्याबाबत आवाहन केले आहे.
गेले वर्षभर काही अंशी कमी होत होत अगदीच शून्यावर गेलेली कोरोना बधितांची संख्या गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा वाढताना दिसत आहे. ठिकठिकाणाहून तशा बातम्या येऊ लागल्या असून महाराष्ट्रातही हा आकडा वाढला असल्याचे दिसत आहे या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांसाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही काळजी वाढविणारी बाब आहे. आपण सर्वांनी आरोग्य विभागाकडून वेळोवेळी येणाऱ्या निर्देशांचे पालन करायला हवे, असे सांगत, काळजी घ्या, सुरक्षित रहा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोविडच्या विरोधात सुरु असलेला आपला संघर्ष अद्याप संपलेला नाही. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही काळजी वाढविणारी बाब आहे. नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी आरोग्य विभागाकडून वेळोवेळी येणाऱ्या दिशानिर्देशांचे पालन करावे. काळजी घ्या,… pic.twitter.com/iEvLOjzli6
— Supriya Sule (@supriya_sule) April 5, 2023