दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे यांची निवड झाल्यानंतर देशभरातील कार्यकर्ते, हितचिंतक आणि पदाधिकारी यांनी मेसेजेस, फोन तसेच विविध माध्यमांतून अभिनंदन केले. या सर्वांचे त्यांनी आभार मानले असून हा स्नेह असाच कायम रहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पक्षसंघटनेसह सर्वांचे मनापासून आभार, असे म्हणत त्यांनी...
यशवंतराव चव्हाण सेंटरचे कर्तृत्ववान महिलांना देण्यात येणारे ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार जाहीर
बालगंधर्वमध्ये येत्या २२ जून रोजी वितरण सोहळा पुणे, दि. १० (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारे 'यशस्विनी सन्मान' पुरस्कार जाहीर करण्यात आले असून येत्या २२ जून रोजी पुण्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहेत. राज्यातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता, क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स...
बारामती आणि दौंड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचारी निवासासाठी १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर
खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती पुणे: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती आणि दौंड तालुक्यांत प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कर्मचारी निवासस्थानांसाठी एकूण १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली. या निधीमधून बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात ...
विश्वस्त पदाबाबत जेजुरीकरांच्या लढ्याला यश
खासदार सुप्रिया सुळे यांनी केले अभिनंदन जेजुरी : अखेर जेजुरीकरांच्या लढ्याला यश आले असून देवस्थान ट्रस्टवर नेमण्यात येणाऱ्या विश्वस्तांमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य मिळणार हे आता स्पष्ट झाले. असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या समस्त जेजुरीकरांचे अभिनंदन केले आहे. सुळे यांनी याबाबत ट्विट केले असून ही अतिशय आनंदाची बा...
पहिल्याच पावसात पालखी मार्गाची दुरवस्था
तात्पुरती मालमपट्टी नको; खासदार सुळे यांची आठवड्यात दुसऱ्यांदा दुरुस्तीची मागणी पुणे : रविवारी झालेल्या पहिल्याच पावसात पालखी महामार्गावर अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साठली आहेत. खड्डे बुजविण्यासाठी मुरुमाची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. परंतु पावसामुळे त्याचा चिखल झाला आहे. पालखी सोहळा अवघ्या आठवड्यावर आला असताना या रस्त्याची ही अशी अवस्था झाल...
मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यात धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या सर्व गाड्या पूर्ववत सुरु करा
खासदार सुप्रिया सुळे यांची पीएमपीएमएलकडे पत्राद्वारे मागणी पुणे : मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची सेवा बंद करून सर्व गाड्या कोथरूड डेपोमधून सोडण्यात येत आहेत. तसे करण्याने मार्केट यार्डात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह अन्य सर्वच प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी खास...
मुळशी परिसरातील पुणे ते कोलाड रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे-खा. सुळे
पुणे : मुळशी परिसरातील पुणे ते कोलाड ७५३-ई या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. यामुळे नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी काम अर्धवट राहिले आहे. तरी लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.राज्य रस्ते महामंडळाला याबाबत त्यांनी पत्र लिहिले असून तसे ट्विटही केले आहे. गेल्या तीन वर्...
होर्डिंग कोसळण्याच्या घटनांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता
अहवाल मागवून सुरक्षा ऑडिट करण्याबरोबरच अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याची मागणी पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसह जिल्ह्यात अन्य ठिकाणी होत असलेल्या होर्डिंग कोसळण्याच्या घटनांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली असून पालकमंत्र्यांनी याबाबत अहवाल मागवून संबंधीत यंत्रणांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली...
पालखी महामार्गावर तात्पुरती मलमपट्टी नको; उत्तम दर्जाचे डांबरीकरण करावे - खा. सुळे
पुणे : राष्ट्रीय पालखी महामार्ग ९६५ वरील भेकराईनगर ते वडकी दरम्यान रस्त्याच्या कडेला पडलेले मोठे हे खड्डे बुजविण्या साठी मातीमिश्रीत व निकृष्ट दर्जाचा मुरुम असल्याच्या तक्रारी आहेत. याठिकाणी उत्तम दर्जाचे डांबरीकरण करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबाबतचे वृत्त माध्यमांतूम प्रसिद्ध झाले आहे. त्याचा दाखला देत सुळे यांनी केंद्री...
रखरखत्या उन्हात उभ्या प्रवाशांसाठी खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखर होऊन धावल्या
बंद पडलेल्या शिवशाहीतील प्रवाशांना स्वतःच्या गाडीसह अन्य गाड्यांतून सावलीत हलवले पुणे : कडक उन्हात सांगलीकडे निघालेली एक बस रस्त्यात बंद पडते.... वरून मी म्हणणारे ऊन, सावलीला थांबावे, तर रस्त्यावर जवळपास कुठे झाड नाही, अशा उन्हाच्या काहिलीत रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखरं होत धावून गेल्या. दौऱ्यानिमित्...
पुण्याचे वैभव बालगंधर्व रंगमंदिराची योग्य ती निगा राखा - खा. सुप्रिया सुळे
नाट्यगृहातील दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावावरून उपस्थित केला सवाल पुणे : सांस्कृतिक राजधानी म्हणून नावलौकिक असणाऱ्या पुणे शहराचे 'बालगंधर्व रंगमंदिर ' हे सांस्कृतिक वैभव आहे. पुणेकरांचा हा मानबिंदू तसाच टापटीप आणि स्वच्छ रहायला हवा. कलाकार आणि रसिकांच्या निखळ आनंदात डास व दुर्गंधीचा अडसर असू नये याची दक्षता घ्यायला हवी, अशी अपेक्षा खासदार सुप्...
नानविज गावात एसटी सुरू झाली तेव्हाचा फोटो पोस्ट करत खा. सुळे यांनी भावनिक पोस्ट
बारा वर्षांचा धांडोळा घेत मुलांच्या स्वप्नपूर्तीवरील भाष्याला नेटकऱ्यांची पसंती दौंड : 'काळाचा प्रवाह कधी कुणासाठी थांबत नाही', असे सांगत दौंड तालुक्यातील नानविज गावात एसटी बस सुरू झाली तेव्हाचा एक जुना फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ज्या मुलीसोबत त्यांनी त्यावेळी फोटो काढला होता, त्याच मुलीसोबत आज पुन्ह...
समाविष्ट गावांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा
खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी पुणे : पाण्याच्या बचतीसाठी पुणे महापालिकेने संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे केल्यास आधीच दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या उपनगरांना जास्तच त्रास सहन करावा लागेल. ही अडचण लक्षात घेऊन पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा पाणीपुरवठा बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा, अशी मागण...
बियाणे उद्योगाच्या परराज्यात स्थलांतरित होण्यावरून खा. सुळे यांचे सरकारला खडे बोल
पुणे : जालना जिल्ह्यातील बियाणे उद्योगाचे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात स्थलांतरित होण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळेच बियाणे उद्योग शेजारच्या राज्यात जात आहे. ही नक्कीच भूषणावह बाब नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जालना जिल्ह्यातील बियाणे उद्योग तेलंगणा आज आंध्र प्रदेशात स्थलांतरित ह...
बुडणाऱ्या मुलींचे प्राण वाचवणाऱ्या गोऱ्हे खुर्द येथील शेतकऱ्यांचे खा. सुळेंकडून कौतुक
पुणे : खडकवासला धरणात बुडणाऱ्या मुलींचे प्राण वाचवणाऱ्या गोऱ्हे खुर्द येथील शेतकऱ्यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले असून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो, असे त्यांनी म्हटले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नऊ मुली आज सकाळी गोऱ्हे खुर्द येथे खडकवासला धरणात बुडत असल्याचे पाहताच गोऱ्हे खुर्द येथील शेतकरी संजय माताळे यांनी जीवाची पर्वा न करता धरणात...
सिंधुदुर्ग येथील विमानतळास बॅ. नाथ पै यांचे नाव द्यावे
खा. सुळे यांची केंद्राडे मागणी पुणे : चिपी, सिंधुदुर्ग येथील विमानतळास थोर स्वातंत्र्यसेनानी बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी आहे. याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना टॅग करत त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. सिं...
चांदणी चौकात आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्यावे
खासदार सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका आयुक्तांना पत्र पुणे : चांदणी चौकात नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. चांदणी चौक हा मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असून मुळशीकरांसाठी अत्यंत महत्वाचे योगदान देणाऱ्या स...
नीट परिक्षार्थींच्या अंतरवस्त्रांपर्यंत तपासणीवरून खासदार सुळे यांचा संताप
संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी 'नीट' ही परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींची अंतर्वस्त्रे देखील तपासण्यात आली असून विद्यार्थ्यांना उघड्यावर कपडे बदलावी लागल्याची तक्रार पालक तथा परीक्षार्थींनी केली आहे. या प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या असून अशी अपमानास्पद ...
पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी मार्गाची निविदा लवकर काढण्यासाठी आदेश द्यावेत
खासदार सुप्रिया सुळे यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या हडपसर ते लोणंद या पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी या मार्गाची अद्याप निविदा निघाली नाही. तरी रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात सकारात्मक विचार करुन या मार्गाची निविदा काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे य...
शितगृहाच्या विजबिलाबाबत महावितरणने फेरविचार करावा - खा. सुप्रिया सुळे
पुणे : महावितरणने शीतगृहांच्या वीजबिलांत सुमारे चाळीस टक्क्यांची दरवाढ केली असून पुढील वर्षी ती ५० टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचे प्रस्तावित केले आहे. या दरवाढीचा मोठा फटका अन्नप्रक्रिया उद्योग आणि अन्न साठवणूक उद्योगांना बसणार आहे, तरी याबाबत महावितरणने फेरविचार करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. अन्नप्रक्रिया आणि ते साठवणूक करणे ...