1 minute reading time
(163 words)
पुणे आकाशवणीचा वृत्तविभाग कधीही बंद करु नका, वृत्तविभागात पूर्णवेळ अधिकारी नेमावा-खासदार सुप्रिया सुळे
बंदीच्या निर्णयास स्थगिती दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार
पुणे : पुणेकर जनभावनेची दखल घेत पुण्यातील आकाशवाणी केंद्राचा वृत्तविभाग बंद करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. असे असले तरी या कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी नेमून हा विभाग बंद होऊ नये अशी कायमस्वरूपी कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
येथील वृत्तविभाग बंद करण्यात येणार असल्याचे लक्षात येताच काल खासदार सुळे यांच्यासह पुण्यातील अन्य संस्था, संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यास अपेक्षीत यश आले असून तूर्तास या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. यासाठी सुळे यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले आहे. तसेच हा निर्णय कायम राहण्यासाठी पुण्यात पूर्णवेळ अधिकारी नेमून हा विभाग कधीही बंद होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्तविभाग बंद करण्याचा निर्णय प्रसारभारतीने मागे घेतला. पुढील आदेशापर्यंत येथील हंगामी कर्मचारी पुर्ववत कार्यरत राहतील असे प्रसारभारतीने दिलेल्या पत्रात नमूद आहे. यासंदर्भात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग जी ठाकूर यांना विनंती केली होती.… pic.twitter.com/98piJzfEuu
— Supriya Sule (@supriya_sule) June 15, 2023