1 minute reading time (187 words)

भांडगाव-खुटबाव रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यात यावा

भांडगाव-खुटबाव रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यात यावा File Photo

खा. सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

दौंड : दौंड तालुक्यातील भांडगाव-खुटबाव या रस्त्यावर परिसरातील औद्योगिक व इतर कारणांमुळे मोठ्या प्रमाणात जड व प्रवासी वाहतूक आहे. खुटबाव रेल्वे स्थानकात दुरुस्तीचे काम सुरु असल्यास बऱ्याच वेळा हा मार्ग बंद राहतो. ही कोंडी टाळण्यासाठी याठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे त्यांनी पत्राद्वारे ही मागणी केली असून तसे ट्विट देखील केले आहे. या रस्त्यावर जड वाहने आणि वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी रस्ता कायम वर्दळीने भरलेला असतो. तशातच खुटबाव रेल्वे स्थानकात काही कामे चालू असतील, तर वाहतूक बंद करण्यात येते. त्यावेळी वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी उड्डाणपूल आवश्यक असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.

याठिकाणी ओव्हरब्रीज झाल्यास वाहतूक सुरु राहू शकते आणि नागरीकांची देखील गैरसोय होणार नाही. नागरीकांची सोय लक्षात घेता याठिकाणी ओव्हरब्रीज करण्याबाबत आपण सकारात्मक विचार करावा, असे त्यांनी नमूद केले आहे.
पुष्पगुच्छ, भेटवस्तूऐवजी गरजू मुलांना आवश्यक साहित...
महिला धोरण यशस्वी झाले याचे समाधान