केंद्राकडून ७९२.३९ कोटींचा निधी मंजूर पुणे : पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवे घाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने ७९२.३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली असून आपल्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी ...
खासदार सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न
दिल्ली येथे १७ फेब्रुवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान पुणे : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा जाहीर झाला आहे. विद्यमान सतराव्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभागासाठी, खासगी...
बारामती लोकसभा मतदार संघातील सर्वच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती
मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी खासदार सुळेंची मागणी बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न हळूहळू गंभीर होत चालला आहे. यामुळे तातडीने पाण्याच्या संदर्भाने दुष्काळी आढावा बैठक घेण्याची आवश्यकता आहे, तरी तातडीने बैठकी घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रा...
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांची घोषणा, यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी शरद पवार यांच्या हस्ते वितरण मुंबई दि. १७ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३' ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे ...
महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणावर लोकसभेत चर्चेसाठी वेळ मिळावी
खासदार सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी पुणे दि. १६ महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत, आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी मराठा व धनगर समाजबांधव गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. हे विषय संसदेत मांडले जाणे आवश्यक आहे, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत या विषयावर च...
खासदार सुप्रिया सुळे बसणार उपोषणाला
बावधन येथे महावितरणचे सबस्टेशन झाले नाही, तर २० नोव्हेंबर रोजी करणार उपोषण पुणे : वारंवार मागणी आणि पाठपुरावा करूनही पूर्तता होत नसल्याने खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या असून त्यांनी आता थेट उपोषणाचाच इशारा दिला आहे. महावितरणच्या बावधन येथील सबस्टेशनसाठी त्यांनी हा इशारा दिला असून २० नोव्हेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. बारामती लोकसभा मतदा...
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने बारामती येथे श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न
बारामती : ज्येष्ठ नागरिक आणि कर्णबधीर मुलांनाही ऐकण्याचा अधिकार असून त्यांच्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज बारामती येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. खासदार सुळे यांच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण सेंटर, स्वरूप चॅरिटेबल ट्रस्ट, ठाकरसी ग्रुप आणि महात्मा ...
गृहमंत्र्यांना हवेत पोलिसांच्या रक्षणासाठी बाऊन्सर
कंत्राटी पोलीस भरतीला बाऊन्सरची उपमा देत खासदार सुप्रिया सुळेंची शासनावर टीकेची झोड पुणे : ...तर अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांच्या सुरक्षेसाठी मायबाप दयाळू सरकार ३ हजार' बाऊन्सर' (कंत्राटी सुरक्षारक्षक ) नेमणार आहे, असा उपरोधिक टोला लगावत खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनाच्या पोलीस दलातील कंत्राटी भरतीवर टीकेची झोड उठवली आहे. गृहमंत्र्यांचा आपल्याच...
आरोग्य केंद्राचे ऑडिट करण्याबरोबरच रिक्त पदांची भरती आणि सर्व सुविधा तातडीने द्या
खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे मागणी Meपुणे : नुकत्याच झालेल्या मतदार संघाच्या दौऱ्यादरम्यान बहुतांश प्रथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अपुरे मनुष्यबळ आणि औषधांचा अपुरा पुरवठा होत असल्याचे दिसून आले आहे. या रुग्णालयाचे ऑडिट करावे. याशिवाय सासूनसारख्या बड्या रुग्णालयातही हीच स्थिती आहे. सहा कोटी रुपये देऊनही रुग्णालयाला हाफकीन इन्स्टिट्यूटने औषध पुरव...
पुणे ते अमृतसर थेट रेल्वेसेवा सुरू करावी
शेतमाल पोहोचविण्याच्या दृष्टीने खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारकडे मागणी बारामती : पुणे जिल्ह्यासह बारामती लोकसभा मतदार संघातील अंजीर, द्राक्षे, डाळींब, सीताफळ आदी फळे आणि भाजीपाल्याला अमृतसर पर्यंतच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. याचा विचार करता शेतकऱ्यांच्या सेवेसाठी पुणे ते अमृतसर दरम्यान थेट रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप...
कुरकुंभ आरोग्य केंद्रात रिक्त पदांची भरती आणि ट्रॉमा केअर सेंटरचे अत्याधुनिकिकरण करा
खासदार सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी दौंड : बारामती लोकसभा मतदारसंघातील कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याबरोबरच येथील ट्रॉमा केअर सेंटरचे अत्याधुनिकीकरण करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना याबाबत खासदार सुळे यांनी पत्र लिहिले असून तसे ट्वीटही केले आहे. दौ...
आवश्यक मनुष्यबळाअभावी राज्यातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम
तातडीने रिक्त पदांची भरती करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे पत्राद्वारे मागणी पुणे : आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता कमी झाली आहे. परिणामी आरोग्य सेवेवर होत असून आरोग्य खात्यात तातडीने सर्व रिक्त पदांची भरती करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे य...
नागपुरातील बेरोजगारी हे भाजपची देणं - खा. सुप्रिया सुळे
हिंगणा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांशी सुप्रिया सुळेंचा संवाद नागपूर: नागपूर शहरात आणि ग्रामीण भागात तरुणांच्या हाताला रोजगार नाही, औद्योगिक क्षेत्र ओसाड पडत चालली पण त्याकडे सरकारचं लक्ष नाही. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा ही भाजपची देण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग...
तहसीलदारांच्या कंत्राटी भरतीवरून खासदार सुप्रीया सुळे यांचा संताप
राज्याचा खेळखंडोबा केल्याचा आरोप करत स्पर्धा परीक्षार्थींसाठी व्यक्त केली चिंता पुणे : भाजपाला या महाराष्ट्राचं नेमकं काय करायचंय? आता तहसीलदार देखील कंत्राटी नेमण्याचा घाट या सरकारनं घातला आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून हा निर्णय घेताना, रात्रंदिवस एक करून मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, त्यांचा तरी वि...
पुसेसावळी दंगलीतील मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळवून द्यावी
खासदार सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी पुणे : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी (ता. खटाव) येथे उसळलेल्या दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या नूरहसन शिकलगार यांच्या कुरुबियांना आर्थिक मदत आणि त्यांच्या पत्नीला नोकरी मिळवून द्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, यांच्याकडे ...
कांदाप्रश्नी राज्य शासन उदासीन आणि असंवेदनशील असल्याचा खा. सुळेंचा आरोप
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या बैठकीस महाराष्ट्रातील जबाबदार मंत्र्यांचीच अनुपस्थिती पुणे : केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदाप्रश्नी बोलाविलेल्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातून कोणीही जबाबदार मंत्री आणि नेते गेले नाहीत. हे पाहता कांदा प्रश्नाकडे पाहण्याचा राज्य शासनाचा दृष्टीकोन अतिशय उदासीन आणि असंवेदनशील, असल्याचा आरोप खासदार सुप्रिया...
हडपसर ते झेंडेवाडीदरम्यान पालखी मार्गावरील कामाची ३९९ कोटींची निविदा प्रसिद्ध
खासदार सुळे यांनी मानले गडकरींचे आभार पुणे: खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पालखी महामार्ग अर्थात सासवड रस्त्यावरील हडपसर ते दिवे घाटाचा माथा या दरम्यानचे काम करण्यासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला असून ३९९ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे लवकरच हे काम सुरू होणार असून पुरंदर आणि हवेली तालुक्यातील नागरि...
विकास आराखड्याअभावी पालिकेत समाविष्ट केलेल्या गावांच्या विकासकामांत अडथळे
तातडीने विकास आराखडा तयार करण्याची खा. सुप्रिया सुळे यांची शासनाकडे मागणी पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणेमहापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा आराखडाच अद्याप तयार झालेला नाही. परिणामी या गावांत विकासकामे करताना नेहमी अडथळे येत आहेत, तरी तातडीने या गावांचा करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. मुख्...
धायरी, आंबेगाव नऱ्हे परिसरात घाण, कचरा, खड्डे आणि राडारोड्याची गंभीर समस्या
तातडीने उपाययोजना करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची पालिकेकडे मागणी पुणे : महापालिका हद्दीतील नऱ्हे, आंबेगाव, धायरी या परिसरात धुळ, घाण, कचरा, राडारोडा, पाण्याचे टँकर, खड्डे यांचे साम्राज्य पसरले आहे, या संदर्भात नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. पालिका आयुक्तांनी या समस्यांची तातडीने दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदा...
वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक्सचा आपल्याला सार्थ अभिमान
चांद्रयान-३ वरील चर्चेदरम्यान खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभेत दोन्ही कंपन्यांचा गौरव दिल्ली : 'चांद्रयान-३' मोहिमेत बारामती लोकसभा मतदारसंघातील वालचंदनगर येथील वालचंद इंडस्ट्रीज् आणि खेड शिवापूर येथील व्हिसीबी इलेक्ट्रॉनिक्स या दोन कंपन्यांचेही योगदान असल्याचे सांगताना आपल्याला अभिमान वाटतो, असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत काढले...