यशवंतराव चव्हाण सेंटरच्या दुसऱ्या सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याची घोषणा

विवाहेच्छूक दिव्यांग तरुण तरुणींना नाव नोंदणी करण्याचे खासदार सुळे यांचे आवाहन पुणे, दि.१९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या वर्षीही दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला हो...

Read More
  661 Hits

धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी, केंद्राने स्पष्ट करावे

लोकसभेत खासदार सुळे यांचा कडाडून हल्ला दिल्ली, दि. २१ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र सरकार कष्टकरी धनगर समाजाला बदनाम करत आहे, असा आरोप करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत भाजप आणि शिंदे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून हल्ला चढवला. शिंदे गटाचे खासदार गावित हे धनगर आरक्षणाला विरोध करत आहेत, ही बाब लक्षात आणून देत भाजप आणि केंद्र सरकारने याबाबत आपली ...

Read More
  589 Hits

लम्पीग्रस्त दुग्धव्यवसायिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि आजारावर प्रभावी लसीची गरज

खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेत मागणी दिल्ली, दि. १९ (प्रतिनिधी) - लम्पी या आजारामुळे देशातील पशुधन आणि पर्यायाने दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. शेतकऱ्यांचे यामुळे अतोनात नुकसान झाले असून यावर्षी या आजारामुळे दीड लाखांहून अधिक (१,५५,७२४) जनावरे दगावली तर जवळपास तीस लाख (२९,५२,२२३) जनावरांना लागण झाली. परिणामी दुग्धव्यवसाय करणाऱ्य...

Read More
  541 Hits

जेजुरी औद्योगिक वसाहतीत लोकल स्टेशन आणि पॅसेंजरला मालगाडीच्या बोगी जोडाव्यात

कामगार आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी खासदार सुळे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे मागणी पुणे, दि. २१ (प्रतिनिधी) - बारामती लोकसभा मतदारसंघातील जेजुरीस भेट देणारे भाविक तसेच औद्योगिक वसाहतीचा विचार करता पुणे ते लोणंद लोकलला एमआयडीसी मध्ये एक स्टेशन द्यावे. याशिवाय पुरंदरहून पुणे आणि कोल्हापूर बाजारपेठेत भाजीपाला आणि अन्य कृषी उत्पादने पोहोचवण्यासाठी पॅसेंजर र...

Read More
  606 Hits

फुरसुंगी, उरुळी देवाची पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून २४ कोटी सात लाख मंजूर

खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांना यश पुणे, दि. १६ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत हवेली तालुक्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील नळ पाणी पुरवठा योजनेस शासनाने मंजुरी दिली असून त्यासाठी रुपये २४ कोटी ७ लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने या योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्नशील होत्या. या पाठ...

Read More
  552 Hits

नवले पूल भागातील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलवा

खा. सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पुणे, दि. २२ (प्रतिनिधी) - मुंबई-बंगळुरू महामार्गावर नवले पूल परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आणि रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अंतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलाविण्यात यावी...

Read More
  584 Hits

ग्रामीण भागातील पीएमपीएमएल बससेवा बंद करण्यावरून खासदार सुप्रिया सुळे संतापल्या

मुख्यमंत्र्यानाही लक्ष घालण्याचे आवाहन निर्णय बदलला नाही, तर आंदोलनाचा इशारा पुणे, दि. २५ (प्रतिनिधी) - बारामती लोकसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरु असणाऱ्या पीएमपीएमएलच्या बससेवा बंद करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यावरून खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या असून गोरगरीबांची मुलं शिकावीत असं पीएमपीएमएलच्या कर्त्या-धर्त्यांना वा...

Read More
  554 Hits

केंद्राच्या वयोश्री योजनेचे बारामती मतदार संघात सर्वोत्तम काम - लोकसभेत कौतुक

याच योजनेसाठी निधी मात्र नाही; खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप दिल्ली, दि. १३ (प्रतिनिधी) - केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेचे काम बारामती लोकसभा मतदार संघात सर्वोत्तम झाले आहे. दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना दिलासा देणारी ही योजना असून सामाजिक न्याय विभागाचे त्यासाठी काैतुक केले, याचा आनंदच आहे; मात्र त्याचवेळी या कामासाठी सामाजिक न्याय विभागाला निधी ...

Read More
  531 Hits

पहिल्या कॅबिनेटचा दावा करणारे अडीचशे बैठकानंतरही आरक्षण देऊ शकले नाहीत

संसदेत धनगर मराठा लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणावरून खा. सुप्रिया सुळे आक्रमक दिल्ली, दि. १६ (प्रतिनिधी) - महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते २०१३ मध्ये म्हणाले होते, की २०१४ ला आमचे सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल. त्यानंतर त्यांचे सरकार आले. त्या पाच वर्षांत एकूण २५० बैठका झाल्या. मधल्या काळात महाराष्ट्रात महाआ...

Read More
  517 Hits

वयोश्री आणि एडीप योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उपयुक्त साधनांच्या वाटपासाठी निधी मिळावा

खासदार सुप्रिया सुळे यांची घेतली सामाजिक न्याय मंत्र्यांकडे मागणी दिल्ली, १६ (प्रतिनिधी) - ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली वयोश्री योजना तसेच दिव्यांगांसाठी असलेल्या एडीप योजनेचे सर्वात चांगले काम बारामती लोकसभा मतदारसंघात झाले आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक असे एकूण एक लाख जणांची तपासणी झाली असून त्यांना योजनेतील उपयुक्त साधनांचे वाटप करायचे आहे. त्...

Read More
  560 Hits

बुडीत बँकांच्या ग्राहकांचे पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुलभ व्हावी

खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी दिल्ली, दि. २० (प्रतिनिधी) - बुडीत बॅंकांच्या ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे परत लवकरात लवकर त्यांना मिळावेत यासाठी अशा बँकांची कर्ज वसुली, संपत्ती जप्ती आदी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केली. एखादी बँक जेव्हा बुडीत जाहीर केली जाते. त...

Read More
  582 Hits