पुणे : बावधन बुद्रुक येथील पेबल्स २ सोसायटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई असून येथील रहिवास्यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तातडीने हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केली आहे. पुणे महापालिकेचे ...
पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा- खा. सुळे
पुणे : बावधन बुद्रुक येथील पेबल्स सोसायटीच्या समोर असलेला पीएमपी बसचा थांबा पूर्ववत सुर करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार पीएमपी प्रशासनाला टॅग करत त्यांनी ही मागणी केली आहे. कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरून निगडी, हिंजवडी आणि वडगाव मावळ कडे धावणाऱ्या पीएमपी बसेस पूर्वी बावधन येथील पेब...
महिला दिनी खासदार सुप्रिया सुळे यांची महिला कारभारी असलेल्या विशेष गावाला भेट
पुणे : जगभरात आज महिला दिन साजरा केला जात आहे. पण हवेली तालुक्यातील रहाटवडे या गावाने वर्षातील पूर्ण ३६५ दिवस महिलांचा सन्मान केला आहे. येथील ग्रामपंचयात पूर्णपणे महिलाच चालवतात. बारामती लोकसभा मतदार संघातील या गावाला आवर्जून भेट देत खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व संदस्यांसहित गावकऱ्यांचेही कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.रहाटवडे गावाचे वैश...
अवकाळी पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्या
खासदार सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी पुणे : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान केले आहे. एकीकडे महागाईने आधीच खचलेल्या शेतकऱ्यांचे कालच्या आसमानी संकटाने कंबरडे मोडले आहे. त्यामुळे तातडीने नुकसानीचे पंचनामे करून त्यांना धीर द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे...
आजच्या दिनी लिंगसमभावाचे तत्व रुळावे, म्हणत महिलांना खा. सुळेंकडून खास शुभेच्छा
संपत्तीत महिलांना महत्वाचे स्थान देणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेचा केला विशेष गौरव पुणे : 'आजच्या दिनी लिंगसमभावाचे तत्व समाजात रुळावे' अशी अपेक्षा व्यक्त करत खासदार सुप्रिया सुळे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिला वर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत. पुणे जिल्हा परिषदेने महिलांसाठी हाती घेतलेल्या उपक्रमाचे खास स्वागत करत जिल्ह्यातील तब्बल आठ लाख महिल...
सातव्या वेतन आयोगासाठी आंदोलन करणाऱ्या कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांना खा. सुळेंचा पाठिंबा
पुणे : सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी आंदोलन करत असलेल्या कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठींबा दर्शविला आहे. मंगळवार (दि. २८ फेब्रुवारी) पासून कृषी खात्याच्या सर्व संवर्गातील कर्मचारी आंदोलन करत आहेत, त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी खासदार सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. हे कर्मचारी सध्या शांततामय मार्गान...
पुणे-बंगळूर महामार्गावर शिंदेवाडी येथे भुयारी मार्ग करण्याबाबत खा. सुळे यांचे केंद्राला पत्र
भोर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग ४८ वर भोर तालुक्यातील शिंदेवाडी येथून पुरंदरकडे जाणारा मार्ग आहे. पुरंदर तालुक्यात दळणवळणाच्या दृष्टीने हा महत्वाचा मार्ग असून जड वाहनापासून अन्य सर्व प्रकारची वाहने या रस्त्याचा वापर करतात. त्यांच्यासाठी याठिकाणी भुयारी मार्ग केल्यास सोयीचे होईल, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. के...
अत्यावश्यक सेवा खंडित होणे संतापजनक
भोर उपजिल्हा रुग्णालयावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला खडसावले भोर : आरोग्यासारखी अत्यावश्यक सेवा निधीअभावी खंडीत होणे संतापजनक असल्याचे सांगत भोर येथील उपजिल्हा रुग्णालयाची वीज खंडित झाल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला चांगलेच खडसावले आहे. थकीत वीज बिलामुळे भोर उपजिल्हा रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केला गेल्याचे वृत्त ...
'खासदार आपल्या भेटीला' उपक्रमांतर्गत खा. सुळे यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद
बारामती : 'खासदार आपल्या भेटीला' कार्यक्रमांतर्गत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी यावेळी उत्तरेही दिली.खासदार सुळे या आज बारामती तालुका दौऱ्यावर होत्या. त्यावेळी तुळजाराम महाविद्यालयाने आयोजित केलेल्या 'खासदार आपल्या भेटीला' या कार्यक्रमात...
खा. सुप्रीया सुळेंनी पोस्ट केलेल्या ताडोबातील दोन व्हिडीओनी जिंकली नेटकऱ्यांची मने
पुणे : ताडोबा अभयारण्यातील दोन अत्यंत लोभसवाणे व्हिडीओ खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकौंटवर पोस्ट केले आहेत. अभयारण्यात आपल्या पिलांशी लाडीकपणे खेळणाऱ्या त्या दोन माता मातृप्रेमाचे आत्यंतिक लोभस उदाहरण असल्याने या पोस्टवर लाईक्स चा पाऊस पडत आहे. अनुज खरे यांनी हे व्हिडीओ शेअर केल्याचे खासदार सुळे यांनी म्हटले आहे. त्यापैकी एका व...
काश्मीरमधील ज्ञानक्रांतीचा भाग व्हा
पुण्यातील सरहद संस्थेच्या आवाहनाला खासदार सुप्रिया सुळे यांचा पाठींबा पुणे : काश्मीरमधील ज्ञान क्रांतीचा एक भाग होण्यासाठी जगातील सर्वात मोठे पुस्तकांचे गाव, नॉलेज व्हॅली अर्थात ज्ञानाचे खोरे घडविण्यासाठी पुण्यातील सरहद संस्थेने मदत करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाला पाठींबा दर्शवत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्या...
खासदार सुळे यांनी पोस्ट केलेल्या चिमुकल्या संग्रामच्या व्हीडीओवर लाईक्सचा पाऊस
इंदापूर : आपल्या मतदार संघातील वेगवेगळ्या गावांना सातत्याने भेट देऊन तेथील लोकांना भेटणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, पाठपुरावा करणे, एखादी चांगली गोष्ट आढळून आली तर आवर्जून तिथं थांबणे, कौतुक करणे, पाठीवर हात ठेवून शाबासकी देणे... या गोष्टींसाठी खासदार सुप्रिया सुळे या सतत अग्रेसर असतात. नुकत्याच एका दौऱ्यात त्यांना ...
जगभर कांद्याची टंचाई, तर भारतात फेकून देण्याची वेळ
निर्यातबंदी मागे घेऊन कांदा जागतिक बाजारपेठेत पाठवा - खासदार सुप्रिया सुळे पुणे : कृषीमालाच्या आयात-निर्यात धोरणात सातत्य नसल्याचा मोठा फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी तातडीने मागे घेऊन देशातील जास्तीचा कांदा जागतिक बाजारपेठेत पाठविल्या...
आकाशात मुक्त विहार करणाऱ्या फ्लेमिंगोंचा व्हिडीओ खा. सुळे यांनी पुन्हा केला पोस्ट
कुंभारगाव-इंदापूरला भेट देण्याचे पर्यटकांना आवाहन इंदापूर : उजनीचा विस्तीर्ण जलाशय आणि त्यावर मुक्त विहार करणारे फ्लेमिंगो पक्षी ही चालू हंगामातील एक नितांत सुंदर अशी पर्वणीच असते. हजारो किलोमीटरचा प्रवास करून या धरणाकाठी वास्तव्यास आलेल्या या परदेशी पाहुण्यांचा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा व्हिडीओ पोस्ट केला असून सोशल मीडियावर तो चांगलाच...
अंगणवाडी सेविकांना न्याय मिळायला हवा
खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पुणे : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर गेल्या आहेत. महिला आणि बालकांचे आरोग्य तथा कुपोषण यांसारख्या अनेक बाबींमध्ये अंगणवाडी सेविकांचे अत्यंत महत्वाचे योगदान असते. त्यांना सरकारने योग्य तो न्याय द्यायला हवा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्य...
ओडिशामध्ये आंदोलकांनी थांबवलेली हावडा एक्स्प्रेस खा. सुळेंच्या मध्यस्तीनंतर सुखरूप रवाना
रेल्वेमंत्र्यांकड़े तत्काळ पाठपुरावा करून मदत केल्याबद्दल प्रवाशांकडून सुळे यांचे आभार पुणे : कोलकाता येथून निघालेली हावडा एक्सप्रेस ओडिशामध्ये आंदोलकांनी अडविली होती. या गाडीत बारामती लोकसभा मतदारसंघातील तसेच महाराष्ट्रातील काही प्रवासी आहेत. त्यांची सुरक्षा आणि गाडी पुढे निघायला हवी यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केल्यानंतर गाडी पुढे ...
संसदरत्न पुरस्कारासाठी डॉ. अमोल कोल्हे आणि डॉ. फौजिया खान यांचे खा. सुळेंकडून अभिनंदन
पुणे: चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीच्या संसदरत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि राज्यसभेच्या खासदार डॉ. फौजिया खान यांना जाहीर झाला आहे. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ट्विट करत त्यांनी अभिनंदन केले असून राष्ट्र...
"...और कारवाँ बनता गया"
शरद पवार यांचा साठच्या दशकातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल पुणे : "...और कारवाँ बनता गया!"अशी कॅप्शन देत खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार शरद पवार यांचा १९५६ सालातला एक फोटो पोस्ट केला आहे. शरद पवार यांनी २२ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिल्यांदा विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यांच्या या संसदीय कारकीर्दीला यावर्षी ५६ वर्षे पुर्ण झाली. त्य...
जेजुरी - कोळविहिरे भुयारी रेल्वे मार्गाचे काम तातडीने करा : खासदार सुप्रिया सुळे
पुरंदर : पुणे ते मिरज दुहेरीकरण अंतर्गत असणाऱ्या जेजुरी-कोळविहीरे रेल्वे भुयारी मार्गाचे काम रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील पुर्ण होऊ शकले नाही. याठिकाणी स्थानिकांना होणारा त्रास आणि होणारे अपघाताला नागरिक अक्षरशः कंटाळले आहेत, असे सांगत तातडीने हे काम पूर्ण करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.र...
पालखी मार्गावरील फुरसुंगी ते सासवड रस्त्याचे काम तातडीने हाती घ्या : खा. सुप्रिया सुळे
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील फुरसुंगी ते सासवड दरम्यानच्या कामासाठी सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर काम सुरू करून नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाला केली आहे. अत्यंत वर्दळीचा हा रस्ता असून सातत्याने वाहतूक कोंडी होत ...