1 minute reading time (122 words)

उपनगरांतील स्ट्रीट लाईटचे काम पंधरा एप्रिलपर्यंत होणार पूर्ण

खासदार सुळे यांना पालिका आयुक्तांचे आश्वासन

खासदार सुळे यांना पालिका आयुक्तांचे आश्वासन

पुणे : शहरालगतच्या उंड्री, पिसोळी, आंबेगाव, सुस व बावधन येथील स्ट्रीट लाईटचे काम १५ एप्रिल पर्यंत महापालिका पुर्ण करेल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

खासदार सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली असून पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी तसे आश्वासन दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. आयुक्त विक्रम कुमार आणि पालिकेच्या अन्य अधिकाऱ्यांसोबत खासदार सुळे यांची बैठक झाली. त्यावेळी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर आयुक्तांनी तसे आश्वासन दिल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 

शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारण्यावरून खासदार सुप्र...
बारामती उपविभाग ठरला देशातील सर्वाधिक अन्नप्रक्रिय...