1 minute reading time (167 words)

शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांचा शासनावर संताप

शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांचा शासनावर संताप

आडमुठेपणा तातडीने बंद करण्याची मागणी

 पुणे: शेतकऱ्यांना खते देताना भरून घेण्यात येणाऱ्या अर्जात त्यांची जात विचारली जात आहे. ही बाब लक्षात येताच खासदार सुप्रिया सुळे राज्य सरकारवर चांगल्याच संतापल्या असून तातडीने हा प्रकार बंद करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांची जात विचारली जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांपैकी एक बातमी ट्विट करत खासदार सुळे यांनी जात का विचारली जात आहे?, असा सवाल उपास्थित केला आहे. मागेल त्या शेतकऱ्याला खत पुरविण्याचे धोरण सरकारने स्वीकारले पाहिजे. त्यासाठी जात विचारुन सरकार नेमकं काय साध्य करु पाहत आहे? हे कशासाठी याचा सरकारने खुलासा करण्याची गरज आहे, असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

केवळ जात या कारणावरून शेतकऱ्यांना खत नाकारु नये असे म्हणत हा आडमुठेपणा तातडीने बंद करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेत्या दिव्यांग खेळाडू मुल...
उपनगरांतील स्ट्रीट लाईटचे काम पंधरा एप्रिलपर्यंत ह...