1 minute reading time (170 words)

राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेत्या दिव्यांग खेळाडू मुलीचे खासदार सुळेंकडून कौतुक

पॅरा ऑलिम्पिक साठी सहकार्याचे आश्वासन

पॅरा ऑलिम्पिक साठी सहकार्याचे आश्वासन

बारामती : पोहण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेत १७ ते २१ या वयोगटात सुवर्णपदक पटकावणारी बारामती येथील दिव्यांग विद्यार्थिनी वरदा कुलकर्णी हिचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पॅरा ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असलेल्या या मुलीला आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

बारामती मधील 'बालकल्याण केंद्र मतिमंद विभाग' मध्ये शिकत असलेल्या वरदा कुलकर्णी हिने यापूर्वी मालवण येथील समुद्रात पोहण्याच्या स्पर्धेतही चाैथा क्रमांक मिळवला होता. या यशाबद्दल तिचे अभिनंदन करून खासदार सुळे यांनी आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

वरदा हिने यावेळी बोलताना आगामी काळात पॅरा ऑलंम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्न असल्याचे सांगितले त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन सुळे यांनी यावेळी दिले. वरदाचे पालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, दिव्यांग केंद्राचे अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

बारामती लोकसभा मतदार संघात गॅस पाईपलाईन आणि सीएनजी...
शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारण्यावरून खासदार सुप्र...