1 minute reading time
(175 words)
बारामती लोकसभा मतदार संघात गॅस पाईपलाईन आणि सीएनजी स्टेशन्स वाढवावे
खा. सुळे यांची केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा
दिल्ली : बारामती लोकसभा मतदारसंघातील गॅस पाइपलाईन आणि सीएनजी गॅस स्टेशन्स वाढवण्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
बारामती लोकसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त घरांना पाईपलाईनने स्वयंपाकाचा गॅस पुरविण्याबाबत यावेळी खासदार सुळे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. याशिवाय बारामती लोकसभा मतदार संघात अद्याप बऱ्याच ठिकाणी वाहनांसाठी आवश्यक सीएनजी गॅस स्टेशन्स नाहीत. त्यांची संख्या वाढवायला हवी जेणे करून सीएनजी गॅसवर चालणाऱ्या गाड्यांची पर्यायाने वाहनधारकांचा खोळंबा होणार नाही, ही बाब त्यांनी या भेटीदरम्यान हरदीपसिंग पुरी यांच्या लक्षात आणून दिली.

याबरोबरच शहरांच्या स्वच्छतेबाबतही केंद्रीय मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाल्याचे सुळे यांनी सांगितले. ही चर्चा सकारात्मक झाली असून आपल्या मतदार संघातील सीएनजी गॅस स्टेशन्स वाढवण्यासाठी आणि स्वयंपाकाचा गॅस जास्तीत जास्त घरांना पाईपद्वारे पुरवण्याबाबत ते नक्किच सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास खासदार सुळे यांनी व्यक्त केला.
केंद्रीय पेट्रोलियम व नगरविकास मंत्री हरदीपसिंगजी पुरी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातील गॅस पाइपलाईन आणि सीएनजी गॅस स्टेशन्स संदर्भातील मुद्दे मांडले. बारामती लोकसभा मतदारसंघातील घरांना पाईपलाईनने स्वयंपाकाचा गॅस पुरविण्याबाबत चर्चा केली. pic.twitter.com/eCb3Mgkz30
— Supriya Sule (@supriya_sule) March 15, 2023