1 minute reading time (200 words)

खा. सुप्रीया सुळेंनी पोस्ट केलेल्या ताडोबातील दोन व्हिडीओनी जिंकली नेटकऱ्यांची मने

खा. सुप्रीया सुळेंनी पोस्ट केलेल्या ताडोबातील दोन व्हिडीओनी जिंकली नेटकऱ्यांची मने
पुणे : ताडोबा अभयारण्यातील दोन अत्यंत लोभसवाणे व्हिडीओ खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकौंटवर पोस्ट केले आहेत. अभयारण्यात आपल्या पिलांशी लाडीकपणे खेळणाऱ्या त्या दोन माता मातृप्रेमाचे आत्यंतिक लोभस उदाहरण असल्याने या पोस्टवर लाईक्स चा पाऊस पडत आहे.

अनुज खरे यांनी हे व्हिडीओ शेअर केल्याचे खासदार सुळे यांनी म्हटले आहे. त्यापैकी एका व्हिडिओ मध्ये वाघीण आपल्या दोन बछड्यांसोबत खेळत आहे. अभयारण्यातील रस्त्याच्या कडेला अर्धवाळल्या गवतावर लोळण घेत एकमेकांना लाडीकपणे पंजा मारणे, उड्या मारणे, पडणे आणि या त्यांच्या लीला पाहून स्वतः वाघिणीचेही त्यांच्याबरोबर उड्या मारत लडिवाळ खेळणे फारच आल्हाददायक आणि मातृप्रेमाने भारलेले आहे.

दुसऱ्या व्हिडीओमध्ये मादी अस्वल तिच्या पिलांना घेऊन निघाली आहे. ती पिले कधी खाली येतात, तर कधी तिथेच तिच्या पाठीवर घट्ट बसून राहतात, एक पाठीवरच राहते, तर दुसरे त्या दोघांच्या मागून चालू लागते. पुन्हा त्याला जवळ घेण्यासाठी त्याची आई काही पावले मागे येते, त्याला चुचकारत जवळ घेते, इतकं लोभासवणं हे दृष्य नेटकऱ्यांच्या पसंतीस पडले नसते तरच नवल. त्यामुळे या दोन्ही व्हिडिओवर हजारो लाईक्सचा पाऊस पडत आहे. 

'खासदार आपल्या भेटीला' उपक्रमांतर्गत खा. सुळे यांच...
काश्मीरमधील ज्ञानक्रांतीचा भाग व्हा