1 minute reading time (189 words)

'खासदार आपल्या भेटीला' उपक्रमांतर्गत खा. सुळे यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद

खासदार आपल्या भेटीला' उपक्रमांतर्गत खा. सुळे यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद
बारामती : 'खासदार आपल्या भेटीला' कार्यक्रमांतर्गत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी यावेळी उत्तरेही दिली.

खासदार सुळे या आज बारामती तालुका दौऱ्यावर होत्या. त्यावेळी तुळजाराम महाविद्यालयाने आयोजित केलेल्या 'खासदार आपल्या भेटीला' या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. महाविद्यालयीन युवक युवतींनी त्यांना यावेळी अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले. यात राजकीय प्रश्नांबरोबरच संसदीय व्यवस्था, तेथील प्रश्नोत्तरे, सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांची कामे, अधिकार, कर्तव्ये आदी प्रश्नांचा समावेश होता.

विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांना उत्तरे देत खासदार सुळे यांनी त्यांच्या बहुतांश शंकांचे निरसन केले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह जाणवत होता. खासदार सुळे यांनी आपल्या महाविद्यालयात येऊन आपल्याशी संवाद साधला, प्रश्नांची उत्तरेही दिली याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. संस्थेचे सचिव मिलिंद शहा- वाघोलीकर, करण शहा-वाघोलीकर, धवल शहा-वाघोलीकर, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर, उपप्राचार्य डॉ. सीमा नाईक-गोसावी, डॉ. योगिनी मुळे, डॉ. फाटक आणि रजिस्ट्रार अभिनंदन शहा यांच्यासह अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अत्यावश्यक सेवा खंडित होणे संतापजनक
खा. सुप्रीया सुळेंनी पोस्ट केलेल्या ताडोबातील दोन ...