1 minute reading time (165 words)

बावधन बुद्रुक मधील पेबल्स २ सोसायटीच्या पाणी प्रश्नाबाबत खा. सुळे यांची पुन्हा मागणी

बावधन बुद्रुक मधील पेबल्स २ सोसायटीच्या पाणी प्रश्नाबाबत खा. सुळे यांची पुन्हा मागणी
पुणे : बावधन बुद्रुक येथील पेबल्स २ सोसायटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई असून येथील रहिवास्यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तातडीने हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केली आहे.

पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना टॅग करत त्यांनी हे ट्विट केले आहे. गेल्या महिन्यात २० तारखेलाही त्यांनी हा विषय उपस्थित केला होता. त्याची आठवण सुद्धा करून दिली आहे.

या सोसायटीमधील नागरीकांना टॅंकरसाठी मोठी रक्कम खर्च करावी लागत आहे. रोज पाणी विकत घ्यावे लागत असल्याने हा मोठा आर्थिक व मानसिक त्रास येथील रहिवासी सहन करत आहेत, तरी त्यामुळे येथील पाणीप्रश्न सोडविणे अत्यावश्यक असल्याने आपण स्वतः येथे लक्ष देऊन लवकरात लवकर पाणीप्रश्न मार्गी लावावा, असे त्यांनी म्हटले आहे. 

पुरंदर तालुक्यातील काही गावांच्या कनेक्टिव्हीटीसाठ...
पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर...