1 minute reading time
(194 words)
पुणे-बंगळूर महामार्गावर शिंदेवाडी येथे भुयारी मार्ग करण्याबाबत खा. सुळे यांचे केंद्राला पत्र
भोर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग ४८ वर भोर तालुक्यातील शिंदेवाडी येथून पुरंदरकडे जाणारा मार्ग आहे. पुरंदर तालुक्यात दळणवळणाच्या दृष्टीने हा महत्वाचा मार्ग असून जड वाहनापासून अन्य सर्व प्रकारची वाहने या रस्त्याचा वापर करतात. त्यांच्यासाठी याठिकाणी भुयारी मार्ग केल्यास सोयीचे होईल, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. या मार्गावरून जड वाहने त्याचबरोबर इतरही वाहने जातात तसेच आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थही या मार्गावरून प्रवास करत असतात. त्यामुळे या मार्गावर लहानमोठे अपघात होण्याचे प्रमाण आहे. तरी याठिकाणी भुयारी झाल्यास सर्वच प्रवाशांना सोयीचे होईल आणि अपघात होण्याचे प्रमाणही कमी होईल, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.

शिंदेवाडी आणि गोगलवाडी येथील ग्रामस्थांनीही याबाबत मागणी केली असून या संदर्भात गोगलवाडीचे सरपंच अशोक गोगावले यांनी निवेदन दिले आहे. तरी राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर शिंदेवाडी येथे भुयारी मार्ग मंजूर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर शिंदेवाडी ता: भोर येथून पुरंदरकडे जाणारा महत्वाचा रस्ता आहे. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. या रस्त्यावरील वाहतूक पाहता तो शिंदेवाडी येथे ओलांडणे धोक्याचे आहे. याठिकाणी व्हेईकल अंडरपास होणे आवश्यक आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) March 3, 2023