2 minutes reading time (427 words)

बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे ४५ कोटी रुपये मंजूर

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

 पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्ते व इतर विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ४४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या कामांसाठी सुळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर निधी मंजूर झाला असून प्रलंबित कामे तातडीने हाती घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी सुळे यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

बारामती लोकसभा मतदार संघातील तालुकानिहाय मंजूर निधी आणि त्यातून करण्यात येणारी कामे पुढीलप्रमाणे -
भोर तालुका - रा.मा १३२ पासून भोगवली फाटा- माहूर परिचे, प्रजिमा ४९ कि.मी ०/०० ते ५/०० ची सुधारणा करणे -रु. ४००.०० लाख (चार कोटी)

वेल्हे तालुका - चिरमोडी साखर मार्गासनी वांगणी निगडे कुसगाव रस्ता, प्रजिमा ४१. कि.मी ०/०० ते ६/०० व १३/०० ते १८/०० चे रुंदीकरण व सुधारणा करणे - ५००.०० लाख (पाच कोटी)

मुळशी तालुका - पाषाण- सुस-लवळे-मुठा- बहुली रस्ता. रा.मा. ११५ कि.मी. २०/०० ते ३०/०० ची सुधारणा करणे - ५०० .०० लाख.
पानशेत मोसे आडमाळ पडळघर दासवे मुगाव भोईनी रस्ता करणे प्रजिमा १६४ कि.मी २८/०० ते ३७/०० -५००.०० लाख (पाच कोटी)

पुरंदर तालुका - रा.मा.क्र १२० ते दिवे- सोनोरी- कुंभारवळण- कोथळे-नाझरें क.प - पांडेश्वर ते इजिमा १०९ पर्यंतचा रस्ता, प्रजिमा २०३ कि.मी १५/०० ते ३५/०० ची सुधारणा करणे - ५००.०० लाख (पाच कोटी)
सटलवाडी-पिंगोरी-कवडेवाडी-कोळविहिरे- मावडी क.प - पांडेश्वर नायगाव- माळशिरस रस्ता प्रजिमा १३४ कऱ्हा नदी २८/१०० वर पूल बांधणे - ६००.०० लाख (सहा कोटी), पिंगोरी येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे - १०.०० लाख, पिंगोरी येथील बंधारा दुरूस्त करणे - १०.०० लाख, पिंगोरी ते भोसलेवस्ती रस्ता काँक्रीटीकरण करणे - १०.०० लाख.

हवेली तालुका - प्रजिमा ३६ डोणजे-गोळेवाडी ते कोंढणपूर फाटा रस्ता करणे( लांबी ७ कि.मी) - ३००.०० लाख (तीन कोटी), रा. मा. ११५ वारजे ते बहुली, कि.मी ३१/०० ते ३७/०० रस्ता करणे - ३००.०० लाख (तीन कोटी), खडकवाडी येथे व्यायामशाळा आरसीसी स्ट्रक्चर व बांधकाम करणे - २५.०० लाख, गोऱ्हे खु. येथे दलित समाज मंदिर इमारत बांधकाम करणे १५.०० लाख, मणेरवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयावर पत्रा शेड बांधकाम करणे- १०.०० लाख

दाैंड तालुका
नानवीज ते रा.मा ६८ रस्ता ग्रा.मा ९२ कि.मी ०/०० ते ५/०० रस्त्याची सुधारण करणे ( भाग- नानवीज ते गार) - २००.०० लाख (दोन कोटी, (गिरिम) धनगरवस्ती ते प्रजिमा ९६ रस्ता, ग्रा. मा १४४ कि.मी ०/०० ते २/५०० रस्त्याची सुधारणा करणे ( भाग-गिरिम ते धनगरवस्ती) - २००.०० लाख (दोन कोटी), कुसेगाव रोटी पांढरेवाडी कुरकुंभ ते प्रजिमा ६७ रस्ता प्रजिमा १७७. कि.मी १३/०० ते १४/५०० रस्त्याची सुधारणा करणे ( भाग- कुरकुंभ ते काैठडी) २००.०० लाख (दोन कोटी), नवीन गार ते बेटवाडी धनगरवस्ती रा. मा ६५ ते रोटी रस्ता प्रजिमा १८५ कि.मी १०/९०० वर लहान पुलाचे बांधकाम करणे ( गिरिम ते कुरकुंभ रस्त्यावर कॅनाॅल वर)- २००.०० लाख (दोन कोटी)
डोंगराळ भागात दरडी कोसळू नये यासाठी संरक्षक जाळी ब...
भुगाव येथे बाह्यवळण रस्ता तर घोटावडे फाटा येथे उड्...