1 minute reading time (208 words)

पुणे-सोलापूर पॅसेंजरला बोरीबेल स्थानकावर थांबा मिळावा

पुणे-सोलापूर पॅसेंजरला बोरीबेल स्थानकावर थांबा मिळावा

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

दौंड : दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे हे रेल्वे स्थानक परिसरातील गावांसाठी सोयीचे आहे. परंतु पुणे-सोलापूर पॅसेंजर येथे थांबत नाही. यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. तरी या गाडीला याठिकाणी थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडे केली आहे.

रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना टॅग करत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. बोरीबेल हे अधिकृत रेल्वे स्टेशन असून जवळपास असलेल्या आलेगाव, काळेवाडी, देऊळगावराजे, शिरापुर, हिगणीबेडी आदी गावातील लोक प्रवासाठी बोरीबेल येथे स्टेशन येतात, परंतु पुणे सोलापूर पॅसेंजर बोरीबेल रेल्वे स्टेशन येथे थांबत नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो, ही बाब त्यांनी लक्षात आणून दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे या आज दौंड तालुका दौऱ्यावर असून त्यांनी बोरीबेल या गावाला भेट दिली. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनंदा माणिक खोमणे यांनी बोरीबेल ग्रामस्थांच्या वतीने त्यांना याबाबत निवेदन दिले. त्याची लागलीच दखल घेत सुळे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. या परिसरातील भागातील प्रवाशांची सोय पाहता बोरीबेल स्थानकावर पुणे सोलापूर पॅसेंजरला थांबा देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
सलग तीन महिने पावसाचे प्रमाण अत्यल्प
बारामती येथील रेल्वेच्या जागेतील सर्व्हिस रस्त्याच...