1 minute reading time
(204 words)
बारामती येथील रेल्वेच्या जागेतील सर्व्हिस रस्त्याच्या कामाची सुळे यांच्याकडून पाहणी
अडचणीवर मार्ग काढल्याबाबद्दल मानले आभार
हा सर्व्हिस रस्ता रेल्वेच्या जागेतून जाणार असल्याने त्यासाठी रेल्वे खात्याने बारामती नगर परिषदेकडे ७ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी केली होती. ती जास्त असल्यामुळे अडचणी येत होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी खासदार सुळे यांचा रेल्वे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता.
अखेर रेल्वे विभागाने सार्वजनिक कामासाठी आपल्या धोरणात बदल करीत रेल्वेच्या जागेचा सार्वजनिक कामांसाठीचा सहा टक्के दर हा दीड टक्क्यांवर आणला. त्यामुळे सर्व्हिस रोडसाठी लागणारी रक्कम १ कोटी ३१ हजार ४४० रूपयांपर्यत कमी झाली. त्यानुसार बारामती नगर परिषदेने ही रक्कम रेल्वे विभागाकडे जमा केल्यानंतर आता रस्त्याचे काम सुरु झाले आहे. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे विभागाचे सुळे यांनी आभार मानले आहेत.
आपल्या बारामती येथील रेल्वे जागेतील सर्व्हिस रोड कामाची पाहणी केली.हा रस्ता रेल्वेच्या जागेतून जाणार असल्याने यासाठी रेल्वे खात्याने बारामती नगर परिषदेकडे ७ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी केली होती. ती जास्त असल्यामुळे अडचणी येत होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी रेल्वे विभागाकडे… pic.twitter.com/xjfnP3tZjk
— Supriya Sule (@supriya_sule) August 18, 2023