नागपुरातील बेरोजगारी हे भाजपची देणं - खा. सुप्रिया सुळे
हिंगणा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांशी सुप्रिया सुळेंचा संवाद
नागपूर: नागपूर शहरात आणि ग्रामीण भागात तरुणांच्या हाताला रोजगार नाही, औद्योगिक क्षेत्र ओसाड पडत चालली पण त्याकडे सरकारचं लक्ष नाही. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा ही भाजपची देण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी हिंगणा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केली. पुढे बोलताना सुळे यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष यांच्याशी आपापसात मतभेद न ठेवता सर्वांनी मिळून भाजप हाच आपला मुख्य शत्रू समजून वैचारिक लढाई जोमाने लढली पाहिजे व येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार निवडून येईल असे प्रयत्न करायला पाहिजे अशा म्हणाल्या. तर यावेळी माजी रमेशचंद्र मंत्री बंग यांनी नागपुरात भाजप सरकारचे मोठे मंत्री असून सुद्धा नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाची मोठी दुर्दशा असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, अल्पसंख्याक सेलचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, माजी आमदार विजय घोडमारे (पाटील) माजी आमदार दीनानाथ पडोळे, माजी आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेतील गटनेते दिनेश बंग, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ टाकसांडे , जिल्हाध्यक्ष राजू राऊत, शहराध्यक्ष दुनेश्वर, पेठे, नागपूर जिल्हा ग्रामीण निरीक्षक अतुल वांदिले आदी प्रमुख उपस्थित होते.