1 minute reading time (116 words)

संसदरत्न पुरस्कारासाठी डॉ. अमोल कोल्हे आणि डॉ. फौजिया खान यांचे खा. सुळेंकडून अभिनंदन

संसदरत्न पुरस्कारासाठी डॉ. अमोल कोल्हे आणि डॉ. फौजिया खान यांचे खा. सुळेंकडून अभिनंदन
पुणे: चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीच्या संसदरत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि राज्यसभेच्या खासदार डॉ. फौजिया खान यांना जाहीर झाला आहे. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ट्विट करत त्यांनी अभिनंदन केले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी नेहमीच आपल्या उत्कष्ट कामगिरीने जनतेचा आवाज सभागृहात मांडण्याचे काम केले आहे. या पुरस्काराने ही बाब पुन्हा अधोरेखित झाली, असे त्यांनी म्हटले आहे. स्वतः खासदार सुळे यांनाही हा पुरस्कार सलग सहा वेळा तर एकदा संसद महारत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

ओडिशामध्ये आंदोलकांनी थांबवलेली हावडा एक्स्प्रेस ख...
"...और कारवाँ बनता गया"