2 minutes reading time (337 words)

ओडिशामध्ये आंदोलकांनी थांबवलेली हावडा एक्स्प्रेस खा. सुळेंच्या मध्यस्तीनंतर सुखरूप रवाना

रेल्वेमंत्र्यांकड़े तत्काळ पाठपुरावा करून मदत केल्याबद्दल प्रवाशांकडून सुळे यांचे आभार​

रेल्वेमंत्र्यांकड़े तत्काळ पाठपुरावा करून मदत केल्याबद्दल प्रवाशांकडून सुळे यांचे आभार

पुणे : कोलकाता येथून निघालेली हावडा एक्सप्रेस ओडिशामध्ये आंदोलकांनी अडविली होती. या गाडीत बारामती लोकसभा मतदारसंघातील तसेच महाराष्ट्रातील काही प्रवासी आहेत. त्यांची सुरक्षा आणि गाडी पुढे निघायला हवी यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केल्यानंतर गाडी पुढे रवाना झाली.

ओडिशा मध्ये आंदोलकांनी गाडी थांबवल्याचे लक्षात येताच खासदार सुळे यांनी तत्काळ रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून प्रवाशांची सुरक्षा व इतर सुविधांबाबत लक्ष द्यावे अशी विनंती केली. त्यानुसार लागलीच त्यांनी दखल घेत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या; आणि प्रशासनाने तातडीने कार्यवाही करीत या प्रवाशांना मदत पुरवली.

पुढील एक तासात गाडी पुढे रवाना झाली असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत, असे खासदार सुळे यांनी सांगितले. रेल्वेमंत्र्यांनी मागणीची तातडीने दखल घेतल्याबद्दल सुळे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. संपर्क साधून माहिती देताच तातडीने केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी संपर्क साधून पाठपुरावा करत आवश्यक ती कार्यवाही केल्याबद्दल या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे आभार मानले आहेत. 

Howrah Express that departed from Kolkata had been abruptly stopped due to the public agitation at Bamra railway station in Odisha, since morning. Many women and children passengers from Baramati Lok Sabha Constituency, Pune and Maharashtra were travelling in this train. MP Supriya Sule took notice and immediately contacted the Railway Minister Hon. Ashwini Vaishnaw ji. Tagging him on twitter, she appealed the railway administration to provide help and ensure the passenger's safety. 

Swiftly responding to Sule's appeal, honorable Minister immediately provided relief to the stranded passengers and within an hour the train was on its way back home. Sule expressed her gratefulness towards hon. Vaishnaw ji for their prompt response. 

अंगणवाडी सेविकांना न्याय मिळायला हवा
संसदरत्न पुरस्कारासाठी डॉ. अमोल कोल्हे आणि डॉ. फौज...