1 minute reading time
(116 words)
अंगणवाडी सेविकांना न्याय मिळायला हवा
खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर गेल्या आहेत. महिला आणि बालकांचे आरोग्य तथा कुपोषण यांसारख्या अनेक बाबींमध्ये अंगणवाडी सेविकांचे अत्यंत महत्वाचे योगदान असते. त्यांना सरकारने योग्य तो न्याय द्यायला हवा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
राज्यातील शेकडो अंगणवाडी सेविका संपावर आहेत. परिणामी महिला आणि बालकांशी संबंधीत सर्व कारभार ठप्प झाला आहे. या संपाची दखल घेऊन अंगणवाडी सेविकांना न्याय मिळवून द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविका आपल्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी बेमुदत संपावर गेल्या आहेत. महिला आणि बालकांचे आरोग्य तथा कुपोषण यांसारख्या अनेक बाबींमध्ये अंगणवाडी सेविकांचे महत्वाचे योगदान असते. त्या संपावर असल्यामुळे याबाबतीतला सर्व कारभार ठप्प आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) February 24, 2023