वेल्हा पोलीस ठाण्याची नवीन इमारत लवकरच पूर्णत्वास: खा. सुळे यांनी केली पाहणी
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पोलीस ठाण्यासाठी निधी मंजूर केला होता. लवकरच ही इमारत नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल, असे सुळे यांनी यावेळी सांगितले. याठिकाणी भेट देऊन पाहणी करत त्यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांशी संवादही साधला.
पोलीस ठाण्याबरोबरच पोलिस कर्मचाऱ्यांसाठी देखील या ठिकाणी घरे बांधण्यात येणार असल्याचे खासदार सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतारे, शंकरनाना भुरुक, किरण राऊत, प्रदीप मरळ, वेल्हा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील वेल्हे पोलीस स्टेशनसाठी उभारण्यात येत असलेल्या नवीन इमारतीची पाहणी केली. तत्कालीन उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी या पोलीस स्टेशनसाठी निधी मंजूर केला होता. लवकरच ही इमारत नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल. pic.twitter.com/tak0yLl5kY
— Supriya Sule (@supriya_sule) February 17, 2023